पत्रकाराच्या खुनाचा आरोप असलेल्याचा फोटो उदय सामंतबरोबर - संजय राऊत

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

पत्रकाराच्या खुनाचा आरोप असलेल्याचा फोटो उदय सामंतबरोबर - संजय राऊत

रत्नागिरी (प्रबोधन न्यूज) - व्यक्ती को कुचल देनेसे विचार नही मरता. पत्रकार शशिकांत वारीसे यांचा खून राजकीय आहे. नाणार परिसरात नेत्यांनी बेनामी जमीन खरेदी मोठ्या प्रमाणात केली आहे. त्या सर्व सावकार आणि जमीनदारांनी मिळून शशिकांत यांचा काटा काढण्यासाठी सुपारी दिली. शशिकांतचा खुनी पंढरीनाथ आंबेरकर कोणाबरोबर? असा सवाल संजय राऊतांनी या ट्विटरमधून उपस्थित केला आहे. उदय सामंतबरोबर आरोपी असलेला फोटोच संजय राऊत यांनी ट्विटरवर प्रसिद्ध केला आहे.

रत्नागिरीतील पत्रकार शशिकांत वारीसे यांच्या हत्या प्रकरणावरून राज्यातील राजकीय वातावरण पेटलं आहेय. विरोधकांनी हा मुद्दा उचलून धरत शिंदे फडणवीस सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. यात शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी आज शशिकांत वारीसे यांच्या कुटुंबियांची भेट घेत त्यांच सांत्वन केल. यासह रिफायनरीविरोधातील संघटनांनी आज शशिकांत वारीसे यांच्या मृत्यूची सखोल चौकशी करण्याच्या मागणीसाठी राजापूर तहसील कार्यालयावर मोर्चा काढला आहे. या मोर्चा खासदार विनायक राऊत देखील सहभागी झाले आहेत. तर दुसरीकडे खासदार संजय राऊत यांनी या हत्येप्रकरणाची गांभीर्याने दखल चौकशीच्या मागणीसाठी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिलं आहे.

दरम्यान, या हत्याकांडावर ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी आवाज उठवल्याने त्यांना जीवे मारण्याच्या धमकीचे फोन येत असल्य़ाची खळबळजनक माहिती त्यांनी दिली आहे. तुमचाही शशिकांत वारिसे करू, अशा धमक्या संजय राऊत यांना आल्या आहेत. दुसरीकडे राऊत यांनी वारिसे यांची हत्या आर्थिक घोटाळ्यातूनच झाल्याचा आरोप केला आहे. पत्रकार परिषद घेऊन राऊत यांनी हा आरोप केला आहे.

राऊत यांनी स्वतःच या बाबत माहिती दिली आहे. ते म्हणाले की, मलाही फोन आले आहेत. फोन येत असल्याने मी हा विषय जाहीरपणे तुमच्यासमोर मांडला आहे. मलाही धमकी आली. शशिकांत वारिसे प्रकरणात हात घालू नका. तुम्ही हा मुद्दा उचलला तर तुमचाही शशिकांत वारिसे करू, अशी धमकी मला देण्यात आली आहे. पण मी कोकणात जाणार. वारिसे यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन करणार आहे. त्यांना न्याय देण्यासाठी मी लढणार आहे. या संदर्भात आमचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी माझी चर्चा झाली आहे. त्यांनीही मला कोकणात जाण्यास सांगितले आहे. मीही पत्रकार आहे. संपादक आहे. राज्यात संपादक आणि पत्रकाराची हत्या होत असेल तर चिंतेचा विषय आहे, असे संजय राऊत म्हणाले.

शशिकांत वारिसे हे पत्रकार आहेत. ते रिफायनरीला विरोध करत होते. त्यावर ते लिखाण करत होते. रिफायनरीमुळे होणारे नुकसान लोकांना समजावून सांगणार होते. तसेच रिफायनरी येणार म्हणून ज्या ज्या परप्रांतियांनी जमिनी खरेदी केल्या त्यांची माहिती ते देत होते. तसेच या जमीनदारांशी कुणासोबत हातमिळवणी आहे, याची माहितीही ते देत होते. त्यामुळे मोठ्या आर्थिक घोटाळ्यातून त्यांची हत्या झाली आहे. रिफायनरीला विरोध करणाऱ्यांची हत्या केली जाणार का? असा प्रश्नही राऊत यांनी उपस्थित केला.