न खेळताही परिक्षेत मिळणार गुण

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

न खेळताही परिक्षेत मिळणार गुण

मुंबई, दि. 22 - दहावी आणि बारावीच्या खेळाडू विद्यार्थ्यांना वाढीव राखीव गुण दिले जातात. हे गुण त्यांनी मिळवलेल्या खेळातील नैपुण्यावर आधारित असतात. परंतु कोरोना काल मुळे विद्यार्थ्यांना खेळता आले नाही. त्यामुळे न खेळताही खेळाडू विद्यार्थ्यांना परीक्षेत वाढीव गुण देण्याचा निर्णय राज्य सरकारच्या क्रीडा विभागाने घेतला आहे. मात्र यासाठी खेळाडूंची सहावीनंतरची क्रीडा कामगिरी लक्षात घेतली जाणार आहे.

शासन निर्णयानुसार राष्ट्रीय स्पर्धांमध्ये प्रथम तीन स्थानांवरील खेळाडूंना प्रत्येकी 25 गुण तर सहभागी खेळाडूंना 20 गुण देण्यात येते. राज्य स्पर्धेतील खेळाडूंना अनुक्रमे 20 व 15 गुण दिले जातात. या शिवाय जिल्हा स्पर्धेत सहभागी झालेल्यांना प्रत्येकी पाच गुण देण्यात येतात. 

क्रीडा आणि युवक कल्याण विभागाचे आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांनी शिक्षण विभागाच्या अतिरिक्त आयुक्तांना प्रस्ताव पाठवून वाढीव क्रीडा गुणांसाठी जिल्हा, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये खेळलेल्या दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांची सहाव्या इयत्तेपासूनची कामगिरी विचारात घेण्याची विनंती केली होती. शासनाने त्यांच्या मागणीची दखल घेत खेळाडूंना सलग दुसऱ्या वर्षी क्रीडा गुणांचा लाभ देण्याचा निर्णय घेतला आहे.