राष्ट्रवादीचाही 100 पेक्षा अधिक नगरसेवक निवडून येणार असल्याचा दावा
A PHP Error was encountered
Severity: Notice
Message: Undefined property: stdClass::$link
Filename: post/_post_share_box.php
Line Number: 27
Backtrace:
File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler
File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post
File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once
महापालिकेतील विविध भ्रष्टाचार प्रकरणाच्या चौकशा लागणार - अजित गव्हाणे
पिंपरी, दि. 1 (प्रतिनिधी) - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणूकीत भाजपचे 100 पेक्षा जास्त नगरसेवक निवडून येणार असल्याचा दावा भाजपचे शहर पदाधिकारी करत आहेत. भाजपपाठोपाठ आता राष्ट्रवादी काँग्रेसचेही 100 पेक्षा अधिक नगरसेवक निवडून येतील आणि आमचाच महापौर बसेल असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांनी बुधवारी पत्रकार परिषदेमध्ये केला. तसेच भाजपच्या सत्ता काळात पालिकेत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला असून यामधील विविध प्रकरणाच्या येत्या काळात चौकशा लागणार असल्याचेही ते म्हणाले.
उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार उद्या (शुक्रवार) पिंपरी-चिंचवड शहर दौऱ्यावर येणार आहेत. महापालिकेने केलेल्या विविध विकास कामे आणि भूमिपूजने पवार यांच्या हस्ते होणार आहेत. त्याचबरोबर दुपारी दीडच्या सुमारास शहर राष्ट्रवादीच्या वतीने चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात मेळाव्याचे आयोजन केले आहे. या मेळाव्यात नूतन कार्यकारणीची घोषणा आणि पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्राचे उपमुख्यमंत्री पवार यांच्या हस्ते वाटप करण्यात येणार आहे. याबाबत माहिती देण्यासाठी राष्ट्रवादीच्या वतीने बुधवार (दि.1) रोजी निगडीत पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शहराध्यक्ष गव्हाणे बोलत होते. माजी नगरसेवक भाऊसाहेब भोईर, चिंचवड विधानसभा अध्यक्ष विनोद नढे, पिंपरी विधानसभा अध्यक्ष शाम लांडे, भोसरी विधानसभा अध्यक्ष पंकज भालेकर, युवकचे शहराध्यक्ष इम्रान शेख, महिला अध्यक्षा कविता आल्हाट, माजी विरोधी नाना काटे, विनायक रणसुभे आदी पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहर राष्ट्रवादीच्या वतीने पक्ष संघटना मजबूत करण्यात येत आहे. नवीन कार्यकारणीमध्ये शहराच्या सर्वच भागातील कार्यकर्त्यांना संधी दिली असल्याचे सांगत गव्हाणे म्हणाले, भाजपने पाच वर्षांच्या राजवटीत नागरिकांना दिलेल्या आश्वासनांची पूर्तता केली नाही. महापालिकेत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केला आहे. यामधील काही प्रकरणाची चौकशीही सुरू झाली आहे. येत्या काळात आणखी काही प्रकरणाच्या चौकशा लागणार आहेत. तसेच महापालिका प्रशासक तथा आयुक्त राजेश पाटील यांनी पालिकेच्या प्रशासकीय इमारतीसाठी 312 कोटींच्या निविदा प्रसिध्द करण्याचा धोरणात्मक निर्णय कसा काय घेतला? हा निर्णय खटकणारा असल्याचेही ते म्हणाले.
महिला आरक्षणाची राष्ट्रवादीला चिंता नाही
- महापालिका निवडणुकीसाठी मंगळवारी प्रभागातील महिला आरक्षण सोडत झाली. यामध्ये काही विद्यमान नगरसेवकांचे वॉर्ड उडाले आहेत. मात्र, पुरूष नसेल तर महिला ही आधीपासूनच आमची मानसिकता होती. त्यामुळे महिलेचे आरक्षण पडल्यामुळे आम्हाला जास्त काही चिंता वाटत नसल्याचेही अजित गव्हाणे म्हणाले.