रेल्वे पोलीस लाईन वसाहतीतील पोलिसांची पिण्याच्या पाण्यासाठी कसरत  पुरेशा प्रमाणात व जास्त दाबाने पाणी सोडण्याची छावा मराठा संघटनेची मागणी 

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

रेल्वे पोलीस लाईन वसाहतीतील पोलिसांची पिण्याच्या पाण्यासाठी कसरत    पुरेशा प्रमाणात व जास्त दाबाने पाणी सोडण्याची छावा मराठा संघटनेची मागणी 
 पिंपरी , (प्रबोधन न्यूज )   -  खडकी-औंध रोडवरील रेल्वे पोलीस लाईनला होणारा पाणीपुरवठा कमी दाबाने होत असल्याने गेल्या तीन महिन्यापासून पोलिसांच्या कुटुंबियांना पाण्यासाठी कसरत करावी लागत आहे. पोलीस लाईनचे पाणी सोसायट्याना वळविण्यात आल्याने ही परिस्थिती निर्माण झाली आहे. पोलीस लाईनला जास्त दाबाने पाणी सोडण्याची मागणी छावा मराठा संघटनेचे पुणे जिल्हाप्रमुख रामभाऊ जाधव व बाळू हरिहर यांनी केली आहे.
           पुणे महापालिकेकडून अनेक ठिकाणच्या पिण्याच्या पाण्याच्या पाईपलाईन बदलून नवीन मोठ्या आकाराच्या पाईपलाईन टाकण्यात आल्या आहेत. मात्र, औंध रोडवरील पाटील वस्ती परिसरात मोठ्या प्रमाणात नवीन सोसायट्या झाल्या आहेत. पण पिण्याच्या पाण्याची स्वतंत्र पाईपलाईन टाकण्यात आलेली नाही. जुन्याच पाईपलाईनमधून या सोसायट्याना पाणीपुरवठा करण्यात येत आहे. पोलीस लाईनला पाणीपुरवठा करणारी पाईपलाईनही जुनीच आहे. 
        गेल्या अनेक वर्षांपासून रेल्वे पोलीस लाईनच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. अलीकडच्या काही महिन्यात खूपच कमी प्रमाणात पाणी मिळत आहे. महापालिकेने पोलीस वसाहतीला पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन बदलून नवीन टाकण्यात यावी. नवीन झालेल्या सोसायट्यांकडे वळविण्यात आलेल्या पाण्याचे नियोजन करून पोलीस वसाहतीला पुरेशा आणि जास्त दाबाने पाणी सोडण्यात यावे, अशी पोलिसांनी मागणी केली आहे.
-----------------------------------------
कोट : 
          कमी दाबाने पाणी असल्याने तिसऱ्या मजल्यापर्यंतही पाणी वर चढत नाही. परिणामी पोलीस बांधवांच्या कुटुंबियांना इमारतीच्या खालून पाणी वर घेऊन जावे लागत आहे. काही महिलांची ऑपरेशन झाली आहेत, तर काहींची मुले लहान असल्यामुळे इमारतीच्या खालून पाणी भरणे शक्य होत नाही. त्यामुळे महिला टँकर आल्यावर इमारतीच्या खालीच पाणी भरून ठेवतात. त्यामुळे पोलिसांना ड्युटीवरून थकून घरी आल्यावर पाण्यासाठी धावाधाव करावी लागते. हे सर्व लक्षात घेऊन पुणे महापालिकेने पोलीस बांधवांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तात्काळ सोडवावा.
                 - रामभाऊ जाधव, पुणे जिल्हाप्रमुख छावा मराठा संघटना