आरबीआयची बँकासाठी कोविड लोन बुक योजना काय आहे ?
A PHP Error was encountered
Severity: Notice
Message: Undefined property: stdClass::$link
Filename: post/_post_share_box.php
Line Number: 27
Backtrace:
File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler
File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post
File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once
नवी दिल्ली,(प्रबोधन न्यूज) - कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे गटांगळ्या खात असलेली अर्थव्यवस्था आणि धास्तावलेल्या सामान्य लोकांसाठी रिझर्व्ह बँकेकडून बुधवारी काही महत्त्वपूर्ण घोषणा करण्यात आल्या. यावेळी रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी भारतीय अर्थव्यवस्था पुन्हा रुळावर येत असल्याचे म्हटले. RBI ने बँकांसाठी 'कोविड लोन बुक' ही योजना जाहीर केली. या योजनेनुसार बँकांना तीन वर्षांसाठी रेपो रेटच्या दराने पतपुरवठा केला जाईल. याचा अर्थ बँकांना RBIकडून 4 टक्के इतक्या व्याजाने पैसे मिळतील. छोट्या व्यापाऱ्यांना याचा फायदा होईल, असे जाणकारांचे म्हणणे आहे. या निर्णयामुळे बँकांना कर्जपुरवठा करणे आणखी सुलभ होईल.
काय आहे कोविड लोन बुक?
बँका आपल्या बॅलन्स शीटमध्ये कोविड लोन बुकचा समावेश करतील. कोविड लोन बुकमध्ये जमा असलेल्या रक्कमेइतके पैसे बँकांना रिझर्व्ह बँकेकडे जमा करावे लागतील. यावर बँकांना रेपो रेटपेक्षा 0.4 टक्के इतके जादा व्याज मिळेल.
‘या’ बँकेकडून बचत खात्यावरील व्याजदरात वाढ
कोरोना साथीच्या काळात एअरटेल पेमेंट्स बँकेने ग्राहकांना मोठा दिलासा दिलाय. एअरटेल पेमेंट्स बँकेने आपल्या बचत खात्यावरील ग्राहकांसाठी व्याजदरात वाढ केलीय. आता एअरटेल पेमेंट्स बँकेच्या बचत खात्यात 1 लाख रुपयांपेक्षा जास्त ठेवींवर वार्षिक 6% व्याज मिळेल. सध्या एअरटेल पेमेंट्स बँकेचे 5.5 कोटींहून अधिक ग्राहक आहेत.