धक्कादायक ! ओळखीच्या महिलांचे बनवले तब्बल ४० हजार पॉर्न व्हिडीओ ! पुण्यातील घटनेने खळबळ

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

धक्कादायक ! ओळखीच्या महिलांचे बनवले तब्बल ४० हजार पॉर्न व्हिडीओ ! पुण्यातील घटनेने खळबळ
पुणे - 

पुण्यामध्ये एक धक्कादायक घटनेमुळे खळबळ उडाली आहे. एका तरुणाच्या मोबाईलमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पॉर्नोग्राफिक साहित्य आढळून आलं आहे. शुभम अवदे असं या तरुणाचं नावं असून तो त्याच्या शेजारी राहणाऱ्यातसेच ओळखीच्या महिलांचे फोटो एडीट करुन पॉर्न व्हिडीओ बनवायचा अशी माहिती समोर आलीय. प्राथमिक तपासामध्ये शुभम मागील सहा महिन्यांपासून हे असे पॉर्न व्हिडीओ बनवत असल्याची माहिती समोर आलीय. या तरुणाच्या मोबाईलमध्ये तब्बल ४० हजार पॉर्न व्हिडीओ आणि पाच हजार फोटोही सापडले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ज्या महिलांचे फोटो शुभमने एडीट करुन पॉर्न व्हिडीओ बनवण्यासाठी वापरलेत त्या सर्व स्थानिक महिलाच आहे. हे व्हिडीओ शुभमने सोशल मीडियावर पोस्ट केले होते का याचाही तपास पोलीस करत आहेत. सध्या या प्रकरणामध्ये माहिती तंत्रज्ञान कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय.

पुणे मिररने दिलेल्या वृत्तानुसार या सर्व प्रकरणाची माहिती शुभमच्या मित्राने तक्रार दाखल केल्यानंतर समोर आलीय. 'राजीव गांधी नगरमध्ये राहणारा शुभम आणि मी नेहमी बोलायचो. एकदा तो आम्हाला त्याच्या मोबाईलमध्ये फोटो दाखवताना आम्ही त्याच्या मोबाईलमधील फोटो गॅलरी पाहिली. त्यामध्ये असे शेकडो अश्लील फोटो आणि व्हिडीओ होते. त्यावेळी आम्हाला लक्षात आलं की हे फोटो मॉर्फ केलेले असून आपल्या परिसरामध्ये आजूबाजूला राहणाऱ्या महिलांचेच फोटो वापरुन हे व्हिडीओ बनवण्यात आलेत. यासंदर्भात त्याला जाब विचारला असता त्याने उत्तर देण्यास टाळाटाळ केली. आमच्यासोबतच्या मुलींना त्याच्या फोनमधील ते फोटो पाहून मोठा धक्काच बसला. त्यानंतर आम्ही तक्रार दाखल करण्याचा निर्णय घेतला,' असं तक्रारदाराने म्हटलंय.

या प्रकरणामध्ये गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती खडकी पोलीस स्थानकाचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक दत्तात्रय चव्हाण यांनी दिलीय. कलम ३५४ (अ) (महिलांच्या चरित्र्यावर शिंतोडे उडवणे किंवा तशी वर्तवणूक करणे), ४६९ (एखाद्याच्या प्रतिष्ठेला धक्का पोहचवण्याच्या उद्देशाने त्याची फसवणूक करणे) आणि माहिती तंत्रज्ञान कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय.