काँग्रेसचे प्रदेश सचिव सचिन साठे यांची काँग्रेसला सोडचिठ्ठी

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

काँग्रेसचे प्रदेश सचिव सचिन साठे यांची काँग्रेसला सोडचिठ्ठी

पिंपरी (प्रतिनिधी) - पिंपरी-चिंचवडचे काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष, प्रदेश सचिव सचिन साठे यांनी प्रदेश सचिवपदासह काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. साठे यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना राजीनामा पत्र पाठविले आहे.

मागील काही वर्षापासून सचिन साठे हे काँग्रेस पक्षात नाराज असल्याचे जाणवत होते त्यांनी आपल्या पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष पदाचा राजीनामा वरिष्ठांवर नाराज होऊनच दिला होता त्यांच्या राजीनामामुळे शहर अध्यक्ष पद कैलास कदम यांच्याकडे गेले व सचिन साठे यांना काँग्रेस पक्षाने प्रदेश सचिव पदावर विराजमान केले परंतु शहराच्या पक्ष बांधणीकडे शहरात समस्यांकडे काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठांचे लक्ष नाही अनेक वेळा तक्रार करूनही काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते तक्रारीची दाखल घेत नाही यामुळे सचिन साठे हे काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांवर नाराज होते.

आज त्यांनी काँग्रेस पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा व प्रदेश काँग्रेस सचिव पदाचा राजीनामा दिला आहे त्यांनी आपल्या राजीनामा मध्ये स्पष्ट केले आहे की प्रदेश युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदावर त्यांनी काम केले आहे तसेच पिंपरी चिंचवड काँग्रेसचे शहराध्यक्ष पदावर काम करताना प्रामाणिक व निस्वार्थीपणे काम केले मात्र नेहमी उपेक्षा होत असल्याने यापुढे काँग्रेस पक्षाचे काम करण्याची आपली मानसिकता राहिली नाही त्यामुळे स्वखुशीने आपण प्रदेश काँग्रेसचे सचिव पद व पक्षाच्या प्राथमिक सदस्याचा राजीनामा देत आहोत.

सचिन साठे म्हणाले, मी गेल्या 26 वर्षांपासून निष्ठेने काँग्रेस पक्षाचे काम करत आहे. माल, गेल्या काही दिवसांपासून पक्षीय पातळीवर माझी मोठ्या प्रमाणावर घुसमट होत आहे. पक्षाच्या व्यासपीठावर वेळोवेळी अनेक मुद्दे मी मांडले, त्याकडे गांभीर्याने पाहिले गेले नाही. शहर पातळीवरील पक्षहितासाठी अनेक विषय उपस्थित केले, त्याचीही दखल घेतली गेली नाही. पक्षाकडून अश्या प्रकारे होणारी माझी उपेक्षा मी सहन करू शकत नाही. अशा परिस्थितीत आपण यापुढे पक्षात थांबणे योग्य नाही, अशी भावना झाल्याने मी स्वखुशीने राजीनामा देत आहे.

त्यांनी आपली नाराजी उघड केली असली तरी सध्या पिंपरी चिंचवड शहरात सचिन साठे हे भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चा मोठ्या प्रमाणात होताना दिसत आहे सचिन साठे हे काँग्रेस पक्ष सोडून भारतीय जनता पार्टी पक्षात प्रवेश करतील असे संकेत त्यांनी आपल्या वाढदिवसाच्या कार्यक्रमाच्या वेळीच दिले होते.