लीला मिश्रा यांना 'या' कारणामुळे आयुष्यभर आई, काकू आणि आजीची भूमिका मिळाली !

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

लीला मिश्रा यांना 'या' कारणामुळे आयुष्यभर आई, काकू आणि आजीची भूमिका मिळाली !

मुंबई - 

हिंदी चित्रपटसृष्टीत असे अनेक कलाकार होते ज्यांनी छोट्या-छोट्या पात्रांद्वारे आपली कायम ओळख निर्माण केली. अशाच एक कलाकार होत्या लीला मिश्रा. 17 जानेवारी 1988 रोजी वयाच्या 80 व्या वर्षी लीला मिश्रा यांचे निधन झाले. लीला मिश्रा यांची आज पुण्यतिथी आहे. शोले या चित्रपटाने 'लीला मौसी' या नावाने घरोघरी त्या लोकप्रिय झाल्या. 

प्रसिद्ध अभिनेत्री लीला मिश्रा यांचा जन्म 1908 मध्ये उत्तर प्रदेशातील रायबरेली येथील एका गावात झाला. जेव्हा लीला १२ वर्षांहोत्या, तेव्हा त्यांचे लग्न राम प्रसाद मिश्रा यांच्याशी झाले. मूकपटांमध्ये ते चरित्र कलाकार होते. रामप्रसाद मुंबईत आले तेव्हा त्यांनी लीला यांनाही सोबत आणले. आपल्या करिअरमध्ये 200 हून अधिक चित्रपट करणाऱ्या लीला मिश्रा यांनी 40 च्या दशकात आपल्या करिअरची सुरुवात केली होती. पहिल्या चित्रपटासाठी त्यांना 500 रुपये मिळाले.

लीला मिश्रा खूप सुंदर अभिनेत्री होत्या. अनेक ऑफर येऊनही त्यांनी कधीही मुख्य भूमिका साकारल्या नाहीत. लीला मिश्रा यांना परपुरुषांचा स्पर्श अजिबात आवडत नसे, असे यामागचे कारण सांगितले जाते. यामुळेच त्या नेहमीच आई, काकू, आजी आणि मावशीच्या भूमिकेत दिसायची.

लीला मिश्रा आजही 'चष्मे बद्दूर', 'प्रेम रोग', 'शोले', 'आवारा', 'प्यासा', 'नादिया के पार', 'परिचय', 'सौदागर', 'माँ का आंचल', 'जय संतोषी माँ', 'बैराग' अशा अनेक चित्रपटांसाठी ओळखल्या जातात. पडद्यावर नेहमीच आई आणि मावशीची भूमिका साकारणारी लीला मिश्रा वयाच्या १७ व्या वर्षी खऱ्या आयुष्यात आई बनल्या आणि वयाच्या १८ व्या वर्षापासून त्यांनी पडद्यावर आईची भूमिका साकारण्यास सुरुवात केली.