स्वारगेट आगारातून खासगी वाहतूक बंद ! एसटी महामंडळाचा निर्णय 

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

स्वारगेट आगारातून खासगी वाहतूक बंद ! एसटी महामंडळाचा निर्णय 
पुणे - 
पुण्यातली एसटी बससेवा सुरू होताच एस एसटी महामंडळाने खाजगी वाहतूकदारांना दणका दिलाय, कारण स्वारगेट आगार आणि पुणे विभागातील डेपोतून होणारी खाजगी वाहतूक बंद करण्याचे आदेश काढण्यात आलेत. खाजगी वाहतूकदारांनी मात्र या निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे. काल रात्री एसटी महामंडळानं काढलं पत्रक काढत हा निर्णय जाहीर केला आहे. यामुळे खासगी वाहतुकदारांचे मोठे नुकसान होणार आहे.

गेल्या दोन महिन्यांपासून एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. काही ठिकाणी काही बसेस सुरू झाल्या आहेत, मात्र काही ठिकाणी अजूनही एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरूच आहे, त्यामुळे या काळात लोकांना खासगी वाहनांनी प्रवास करावा लागला. त्यामुळे खासगी वाहतूकदारांची चांदी झाली आहे.  अनेक खासगी वाहतुकदारांनी भाडे वाढवले, त्यामुळे प्रवाशांच्या खिशाला कात्री लागल्याचे दिसून आले. 
दरम्यान, एसटी संपाबाबत अनेक बैठका झाल्या. त्यानंतर जवळपास 14 दिवसांनी सरकारकडून ऐतिहासिक पगारवाढ जाहीर करण्यात आली, मात्र तरीही विलीनीकरणावर काही ठिकाणचे एसटी कर्मचारी ठाम असल्याने एसटी सुरू झालीच नाही. एसटीच्या संपाचा मुद्दा सोडवण्यासाठी शरद पवारही शेवटी मैदानात उतरले, मात्र काही ठिकाणी अजूनही एसटी कर्मचारी कामावर हजर न राहिल्याने अनेक ठिकाणी खासगी वाहतूक सुरू आहे.

पुण्यातले एसटी कर्मचारी कामावर हजर झाल्याने लालपरी पुन्हा सुरू झाली आहे. त्यामुळेच एसटीने पत्रक काढत हा निर्णय जाहीर झाला आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. एसटीचे तिकीट दर खासगी वाहनांत्या तुलनेत कमी असल्याने एसटीचा प्रवास सर्वसामान्यांसाठी सोयीचा ठरणार आहे.