दूध डेअरीतील बॉयलरची सफाई करताना उकळतं पाणी पडून एकाचा मृत्यू; चारजण जखमी 

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

दूध डेअरीतील बॉयलरची सफाई करताना उकळतं पाणी पडून एकाचा मृत्यू; चारजण जखमी 
पुणे -
दूध डेअरी मधील बॉयलरची सफाई करताना हलगर्जीपणामुळे बॉयलरमधील उकळते पाणी कामगारांच्या अंगावर पडले. यामध्ये चार कामगार गंभीर भाजले असून त्यातील एका कामगाराचा मृत्यू झाला. ही दुर्घटना खेड तालुक्यातील चिंबळी फाटा येथे असलेल्या सहारा दूध डेअरी या ठिकाणी घडली. 

उकळते पाणी अंगावर पडल्याने मुकेश रामलाई कश्यप (वय 30 वर्ष) या कामगाराचा मृत्यू झाला आहे. तर सोनू श्रीप्रभूदयाल कश्यप (वय 26 वर्ष), राहुल संतोष कुमार माथूर (वय 18 वर्ष), इसाक अकबर कोतवाल (वय 45 वर्ष) हे कामगार या घटनेत गंभीर जखमी आहेत.

या घटनेप्रकरणी सहारा दूध डेअरी येथील ऑपरेटर अब्दुल गफार अब्दुल रशीद मुल्ला आणि व्यवस्थापक मोहितकुमार राजबहादूर सिंग यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महाळुंगे पोलीस चौकीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश यमगर यांनी या बाबत फिर्याद दिली आहे.