सोलापूरमध्ये तीन अल्पवयीन मुलींचा बुडून मृत्यू

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

सोलापूरमध्ये तीन अल्पवयीन मुलींचा बुडून मृत्यू

सोलापूर -

शेततळ्यांमध्ये पाणी पिण्यास गेलेल्या तीन अल्पवयीन मुलींचा तळ्यात बुडून मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना सोलापूरमध्ये घडली आहे. सानिका गरड (17), पूजा गरड (अंदाजे 13) आकांक्षा युवराज वडजे (11) असे बुडून मरण पावलेल्या मुलींची नावे आहेत. या घटनेमुळे मार्डी गावावर शोककळा पसरली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी: मार्डी गावात राहणाऱ्या सानिका, पूजा, आकांक्षा या तीन मुली दुपारी 1 च्या सुमारास रानात जळण गोळा करण्यासाठी गेल्या होत्या. जळण गोळा करत असताना त्यांना खूप तहान लागली. म्हणून त्या जवळच असलेल्या शेतातील शेततळ्यात पाणी पिण्यासाठी गेल्या. पिण्या पिण्यासाठी तळ्यावर गेल्या असता त्यांचा पाय घसरला आणि तिघीही पाण्यात पडल्या. तिघींनाही पोहता येत नसल्याने त्यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. हे शेत सदाशिव जगताप नावाच्या इसमाच्या मालकीचे आहे.

या घटनेमुळे मार्डी गावावर शोककळा पसरली आहे. तिन्ही मुली गरीब कुटुंबातील असून पाणी पिण्यासाठी गेल्या असताना असा दुर्दैवी मृत्यू आल्याने जिल्ह्यात सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. घटनेची माहिती मिळताच तालुका पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलीस घटनेचा पंचनामा करीत आहेत.