पुण्यात आजपासून 179 लसीकरण केंद्रांवर बूस्टर डोसला सुरुवात; जाणून घ्या सविस्तर 

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

पुण्यात आजपासून 179 लसीकरण केंद्रांवर बूस्टर डोसला सुरुवात; जाणून घ्या सविस्तर 
पुणे -
कोरोनावरील बूस्टर डोसला पुण्यात आजपासून सुरुवात झाली आहे. शहरातील जवळपास 179 लसीकरण केंद्रात बूस्टर डोस दिला जाणार आहे. त्यासाठी उपलब्ध डोसच्या 25 टक्के डोस राखीव ठेवण्यात आलेत. शहारातील ज्या केंद्रावर नियमीतपणे लसीकरण सुरु असे लसीकरण केंद्रे, सरकारी रुग्णालये येथे बूस्टर डोसची मात्रा मिळणार आहे. कोरोना काळात कार्यरत असलेल्या फ्रंटलाईन वर्कर, तसेच 60 वर्षे वयोगटाच्या नागरिकांना या बूस्टर डोसची सुविधा मिळणार आहे.  महापौर मुरलीधर मोहळ यांनी बुस्टर डोशाच्या लसीकरणास सुरुवात होणार आहे. अशी माहिती ट्विट करून दिली आहे.

बुस्टर डोसची मात्र मोफत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या घोषणानुसार बुस्टर डोसची मात्र मोफत असणार आहे. शहरातील सर्व सरकारी, महापालिका तसच खासगी लसीकरण केंद्रावर हा बुस्टर डोस उपलब्ध असणार आहे . आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाईन वर्कर्स , 60 वर्षावरील व्याधीग्रस्त नागरिकांना बुस्टर डोस दिला जाणार आहे. याबरोबरच ज्यांना खासगी हा डोस घ्यायचा असेल त्यांना शुल्काभरतही ही रक्कम मिळणार आहे. आधी जो डोस घेतले आहे, त्याच्या किमतीत हा बूस्टर डोस मिळणार आहे.

'या' नियमांचे करावे लागेल पालन
. लसीचा दुसरा डोस घेऊन 9 महिने उलटले आहेत किंवा 39 आठवडे झालेत, तेच बुस्टर डोस घेऊ शकतात.
. नोकरीचे ओळखपत्र दाखवणे आवश्यक आहे.
. खासगी केंद्रात जरी लस घ्यायची असेल तरीसुद्धा सरकारी केंद्रावर येऊन वर्गवारी नोंदवणे आवश्यक, त्यानंतरच खासगी केंद्रावर लस घेण्यास परवानगी मिळेल.
. विशेष म्हणजे सहव्याधी असलेल्या नागरिकांना बुस्टर डोस घेण्यासाठी कुठल्याही प्रमाणपत्राची गरज नाही.
. ज्या आरोग्य कर्मचाऱ्यांची, फ्रंटलाईन वर्कर्सची, 60 वर्षापेक्षा कमी वय असलेल्यांची नोंद कोविन ऍपमध्ये कर्मचाऱ्यांऐवजी नागरिक म्हणून नोंद झालीय, त्यांनाही शासकीय तसच महापालिका केंद्रात थेट नोंदणी करुन लस मिळेल.