आता कारचे इंटेरियर स्वच्छ करणे झाले एकदम सोपे !

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

आता कारचे इंटेरियर स्वच्छ करणे झाले एकदम सोपे !
मुंबई - 
भारतातील लोक त्यांच्या वाहनांना घरातील सदस्य मानतात. यामुळे ते त्यांची खूप काळजी घेतात. अनेकवेळा असे दिसून आले आहे की लोक त्यांच्या वाहनांचे नामकरणदेखील करतात. लोक त्यांच्या वाहनांवर इतकं प्रेम करतात मग साहजिकच त्याच्या देखभालीसाठीही खूप खर्च करतात.  2019 मधील एका अहवालानुसार, जगभरातील लोकांनी कारच्या देखभाल-दुरुस्तीवर सुमारे 419 अब्ज डॉलर्स खर्च केले आहेत. हा खर्च कारच्या ऍक्सेसरीजच्या देखभालीवर करण्यात आला आहे.  पण करोना साथीच्या आजारात ज्या प्रकारे लोकांचे उत्पन्न कमी झाले आहे, ते पाहता आम्ही तुम्हाला अशा पाच ट्रिक्स बद्दल सांगणार आहोत ज्याच्या मदतीने तुम्ही तुमच्या कारच्या आतील भागाला उत्तम स्वरूप देऊ शकता आणि काही प्रमाणात खर्च वाचवू शकता.
. दुर्गंधी अशी घालवा 
तुमच्या कारमधून येणारा दुर्गंध तुमच्या प्रवासाची मजा खराब करू शकतो. त्यामुळे गाडीत वास पसरणार नाही याची काळजी घ्या. धूम्रपान आणि अल्कोहोल इत्यादींमुळे कारमधून वास येत असेल तर त्यासाठी बाजारात उपलब्ध असलेल्या एअर फ्रेशनरचा वापर करा. बाजारात अनेक एअर फ्रेशनर उपलब्ध आहेत ज्याच्या मदतीने तुम्ही तुमच्या कारला सुगंधित करू शकता. चारकोल पाऊच  दुर्गंध शोषून घेईल म्हणून तुम्हाला हवे असल्यास तुम्ही चारकोल पाऊचदेखील वापरू शकता.
. सीट बेल्ट सॅनिटाईझ करा 
कारच्या आत काहीतरी खाल्ले असल्यास बॅक्टेरिया जमा होऊ शकतात. ते योग्यरित्या सॅनिटायझ केल्यामुळे बॅक्टेरिया नाहीसे होतात. सॅनिटायझिंग केल्यानंतर सूक्ष्म फॅब्रिक कापडाने बेल्ट पुसून काढा. 
. आसन पूर्णपणे स्वच्छ करा
जर तुम्ही गाडीच्या आत काही खाल्ले तर खाल्ल्यानंतर सीट व्यवस्थित स्वच्छ करा. तसेच, प्रत्येक आठवड्याला सीट कव्हर धुवून ठेवा.
. कारचा फ्लोर स्वच्छ करा
चप्पल आणि शूजमधून भरपूर धूळ गाडीच्या फ्लोरवर जमा होते. यामुळे कारचा फ्लोर वेळोवेळी व्यवस्थित धुवा आणि स्वच्छ करा. हा फ्लोर सहज उघडता येतो.
. गाडीच्या डॅश बोर्डची विशेष काळजी घ्या
सहसा आपण कारच्या डॅशबोर्डमध्ये जमा झालेली धूळ पाणी आणि ब्रशने स्वच्छ करतो. यामुळे डॅशबोर्ड नीट साफ केला जात नाही. त्यांना पूर्णपणे स्वच्छ करण्यासाठी क्लिनिंग जेल वापरा. याचा वापर करून डॅशबोर्ड चांगल्या प्रकारे स्वच्छ केले जाऊ शकते. 
Attachments area