स्मार्टफोनची बॅटरी टिकविण्यासाठी 'या' पाच सोप्या ट्रिक्स !

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

स्मार्टफोनची बॅटरी टिकविण्यासाठी 'या' पाच सोप्या ट्रिक्स !
नवी दिल्ली -
कोणतेही काम ऑनलाईन करण्यासाठी स्मार्टफोन खूप उपयुक्त आहे. जर तुम्हाला चित्रपट पाहायचा असेल तो ही चांगल्या पिक्चर क्वालिटीचा, तर ते स्मार्टफोनवर पाहणे शक्य आहे. देशातील बहुतांश लोकांकडे स्मार्टफोन आहेच. स्मार्टफोनमध्ये इतर भरपूर सुविधा असल्या तरी त्याची झरझर उतरत जाणारी बॅटरी हा सर्वांच्याच काळजीचा विषय असतो. अनेकांना मोबाईलची बॅटरी सतत चार्ज करायला वेळ मिळत नाही, मग काय करावे? चला तर, आज अशाच काही टिप्स जाणून घेऊया, ज्यामुळे तुमच्या स्मार्टफोनची बॅटरी लवकर संपणार नाही.

० डिस्प्ले ब्राईटनेस कमी ठेवा 
बऱ्याच लोकांना त्यांच्या फोनच्या डिस्प्लेचा ब्राईटनेस जास्त ठेवण्याची सवय असते. यामुळेच मोबाईलची बॅटरी खूप लवकर संपते. जर तुम्ही ब्राइटनेस जास्त ठेवली तर फोन तुमची बॅटरी सुद्धा जास्त वापरेल. त्यामुळे नेहमी ब्राइटनेस कमी ठेवा, गरज असेल तेव्हाच वाढवा.

० 'या' गोष्टी बंद ठेवा
मोबाइलमध्ये ब्लूटूथ आणि जीपीएस बंद ठेवा, कारण ते चालू ठेवल्याने फोनची बॅटरी वेगाने कमी होते. त्यामुळे गरज असेल तेव्हाच ते चालू करा, अन्यथा त्यांना बंद ठेवा. यामुळे तुमच्या फोनची बॅटरी जास्त काळ टिकेल.

० लाईव्ह वॉलपेपर इन्स्टॉल करू नका 
लाइव्ह वॉलपेपरचा वापर फोनची बॅटरी खूप लवकर कमी करतो. आपण लाईव्ह वॉलपेपर लावण्याऐवजी आपल्या फोनवर सामान्य वॉलपेपर लावल्यास उत्तम. यामुळे बॅटरी लवकर संपण्याची समस्या उद्भवणार नाही.

० बॅकग्राउंड ऍप्स बंद ठेवा 
अनेक लोकांच्या फोनमध्ये बॅकग्राउंड ऍप्स नेहमी चालू असतात. यामुळे फोनची बॅटरी खूप लवकर कमी होते. म्हणूनच, फोनमध्ये असलेले अनावश्यक बॅकग्राउंड ऍप्स बंद करणे कधीही चांगले. जेणेकरून तुमच्या फोनची बॅटरी जास्त काळ टिकेल.
Attachments area