लॅपटॉप गरम होण्यापासून वाचवा 'या' सोप्या टिप्स वापरून !

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

लॅपटॉप गरम होण्यापासून वाचवा 'या' सोप्या टिप्स वापरून !
मुंबई - 
आजच्या काळात लॅपटॉपचा सर्वाधिक वापर होत आहे. लॅपटॉपचे महत्त्व करोनाच्या काळात अधिक समजले, जेव्हा लोकांना घरून काम करावे लागत होते. अजूनही अनेक लोक घरून काम करत आहेत.  मात्र, लोकांना लॅपटॉप संदर्भात अनेक समस्यांनाही सामोरे जावे लागते. सतत काम करीत असल्याने कोणाचा लॅपटॉप खराब होतो तर कोणी लॅपटॉप गरम झाल्याची तक्रार करतात. खरंतर, उन्हाळ्यात लॅपटॉपची समस्या जास्त प्रमाणात दिसून येते, त्यामुळे लॅपटॉप खराब होण्याचा धोका कायम असतो.  बरेच लोक या समस्येकडे जास्त लक्ष देत नाहीत, परंतु काही गोष्टी लक्षात ठेवून तुम्ही लॅपटॉपला अति तापण्यापासून वाचवू शकता.  जाणून घेऊया त्याबद्दल.. 
0 सर्वप्रथम, लॅपटॉप गरम का होतो हे जाणून घेऊया. वास्तविक, बॅटरीच्या पिनमुळे तसेच पंख्यामध्ये धूळ जमल्याने लॅपटॉप जास्त गरम होण्याचा धोका असतो.  म्हणून ते दर महिन्याला किंवा दोन महिन्यांनी व्यवस्थित स्वच्छ केले पाहिजे, जेणेकरून आतली घाण साफ होईल.
 
0 जर तुम्हाला लॅपटॉपची बॅटरी साफ करायची असेल तर सर्वप्रथम ती लॅपटॉपमधून बाहेर काढा आणि कॅन्ड एयर ने उडवून आतील धूळ साफ करा.  याशिवाय सीपीयू फॅन साफ करायचा असेल तर हवेचा दाब कमी आहे का, याची खातरजमा करा. आणि हे देखील लक्षात ठेवा की कोणत्याही इलेक्ट्रॉनिक उपकरणाला पुसण्यासाठी कधीही ओल्या कापडाचा वापर करू नका.
 
0 जर तुमचा लॅपटॉप जुना असेल तर त्याचा बराच काळ वापर न करणे चांगले आहे.  कारण यामुळे लॅपटॉप जास्त गरम होण्याची समस्या उद्भवू शकते.  या प्रकरणात, आपण कूलिंग किट वापरू शकता. पण यानंतरही जर बॅटरी पुन्हा पुन्हा गरम होत असेल तर बॅटरीच बदलणे चांगले.
0 लॅपटॉपच्या CPU फॅनला पुरेशी हवा मिळाल्यास ते जास्त गरम होण्याची शक्यता कमी असते.  बहुतेक लोक बेडवर आरामात बसून किंवा झोपताना लॅपटॉप वापरतात, अशा परिस्थितीत लॅपटॉपच्या खाली एखादे पुस्तक किंवा चौकोनी लाकडी तुकडा ठेवणे चांगले होईल, जेणेकरून सीपीयूच्या पंख्यालादेखील हवा मिळेल.