काय सांगताय ? 'या' स्मार्टफोनवर चक्क 11,000 रुपयांची घसघशीत सूट ?

काय सांगताय ? 'या' स्मार्टफोनवर चक्क 11,000 रुपयांची घसघशीत सूट ?

शाओमी (Xiaomi) ने गेल्या वर्षी Mi 11X सीरीज भारतात लॉन्च केली होती. या मालिकेअंतर्गत Mi 11X आणि 11X Pro स्मार्टफोन लॉन्च करण्यात आले होते. या दोन्ही फोनमध्ये प्रीमियम फीचर्स देण्यात आले आहेत. यापैकी, Xiaomi Mi 11X Pro ची सुरुवातीची किंमत 39,999 रुपये आहे आणि सध्या या फोनवर आतापर्यंतची सर्वात मोठी सूट मिळत आहे. तुम्ही आता Mi 11X Pro चक्क 11,000 रुपयांपर्यंतच्या सूटसह खरेदी करू शकता. चला, जाणून घेऊ या ऑफरबद्दल. 

Mi 11X च्या 6 GB रॅम आणि 128 GB स्टोरेजची किंमत 29,999 रुपये आहे आणि 8 GB रॅम सह 128 GB स्टोरेजची किंमत 31,999 रुपये आहे. Mi 11X Pro चा 8 GB RAM सह 128 GB व्हेरिएंट 39,990 रुपयांच्या किमतीत लॉन्च करण्यात आला होता आणि 8 GB रॅम सह 256 GB मॉडेल 41,999 रुपये किमतीत लॉन्च करण्यात आला होता परंतु आता Amazon India कडून Xiaomi Mi 11X Pro केवळ 29,999 रुपये किमतीत खरेदी करता येईल. तुमच्याकडे SBI बँकेचे कार्ड असल्यास तुम्हाला अतिरिक्त 1,000 रुपयांची सूट मिळेल. Mi 11X Pro सेलेस्टियल सिल्व्हर, कॉस्मिक ब्लॅक आणि फ्रॉस्टी व्हाईटमध्ये उपलब्ध असेल. फोन कंपनीच्या वेबसाइटवर जुन्या किंमतीसह लिस्ट केलेला आहे. नवीन किंमतीसह हा फोन Amazon वर पाहता येईल.

Mi 11X Pro चे स्पेसिफिकेशन 

Mi 11X Pro मध्ये Android 11 आधारित MIUI 12 देखील देण्यात आला आहे. फोनमध्ये 1080x2400 पिक्सेल रिझोल्यूशनसह 6.67-इंचाचा फुल HD + E4 AMOLED डिस्प्ले आहे. डिस्प्लेचा रिफ्रेश दर 120Hz आहे आणि टच सॅम्पलिंग दर 360Hz आहे. फोनच्या डिस्प्लेची ब्राइटनेस 1,300 nits आहे. फोनच्या डिस्प्लेवर कॉर्निंग गोरिल्ला ग्लास विक्टस सपोर्ट आहे. फोनमध्ये HDR10+ साठी सपोर्ट आहे. Mi 11X Pro मध्ये Snapdragon 888 प्रोसेसर, ग्राफिक्ससाठी Adreno 660 GPU, 8 GB RAM आणि 256 GB स्टोरेज आहे.

Mi 11X Pro कॅमेरा

फोनमध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप आहे. Mi 11X Pro मधील प्रायमरी लेन्स 108 मेगापिक्सेल आहे, तर दुसरी लेन्स 8 मेगापिक्सेल अल्ट्रा वाइड आहे. त्याच वेळी, तिसरी लेन्स 5-मेगापिक्सेल मॅक्रो आहे. 108-मेगापिक्सेल लेन्स सॅमसंग एचएम2 सेन्सर आहे. फोनमध्ये सेल्फीसाठी 20-मेगापिक्सल कॅमेरा देण्यात आला आहे. कॅमेरासह ऑप्टिकल इमेज स्टॅबिलायझेशन देखील उपलब्ध असेल.

Mi 11X Pro बॅटरी

कनेक्टिव्हिटीसाठी, फोनमध्ये 5G, ड्युअल बँड Wi-Fi, Wi-Fi 6, GPS, AGPS, NavIC सपोर्ट आणि USB Type-C पोर्ट आहे. Mi 11X Pro मध्ये Bluetooth v5.2 आणि Wi-Fi 6e आहे. फोनमध्ये साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर आहे. Mi 11X Pro मध्ये 4520mAh बॅटरी आहे जी 33W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. फोनमध्ये Dolby Atmos सपोर्टसह ड्युअल स्पीकर आहेत.