पुन्हा एकदा सोन्या, चांदीच्या दरात तेजी !

पुन्हा एकदा सोन्या, चांदीच्या दरात तेजी !

मुंबई -

आज पुन्हा एकदा सोने, चांदीच्या दरामध्ये तेजी दिसून आली आहे. सोमवारी सोन्याचे दर 46,770 वर बंद झाले होते. मंगळवारी सोन्याच्या दरात वाढ झाली आहे. आज सोन्याचे दर प्रतितोळा 47780 रुपयांवर पोहोचले आहेत. म्हणजे सोन्याच्या दरात सरासरी हजार रुपयांची वाढ झाली आहे. तर दुसरीकडे चांदीच्या किमतीमध्ये देखील वाढ झाली असून, चांदीचे दर प्रति तोळा 61 हजार 600 रुपयांवर पोहोचले आहेत.
कमोडिटी मार्केटनुसार आज मुंबईमध्ये 22 कॅरट सोन्याचे दर प्रति तोळा 46780 रुपये आहेत. तर 24 कॅरेट सोन्याचे दर 47770 रुपयांवर पोहोचले आहेत. नागपूरमध्ये प्रति तोळा 22 कॅरट सोन्याचे दर  46780 रुपये आहेत तर 24 कॅरेट सोन्याचे दर 47780 रुपये इतके आहे. पुण्यात 22 कॅरट सोन्याचे दर प्रति तोळा 46220 तर 24 कॅरेट सोन्याचे दर तब्बल 49550 रुपयांवर पोहोचले आहेत. आज पुण्यात सोने चांगलेच महाग झाल्याचे दिसून येत आहे.