कच्च्या तेलाच्या किमतीत घसरण ; भारतात पेट्रोल, डिझेलचे दर स्थिरच 

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

कच्च्या तेलाच्या किमतीत घसरण ; भारतात पेट्रोल, डिझेलचे दर स्थिरच 

नवी दिल्ली -

आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण झाल्यामुळे जगभरामध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी होताना दिसत आहेत. कच्च्या तेलाच्या किमती कमी झाल्याने भारतात पेट्रोल,डिझेल काही प्रमाणात स्वस्त होईल अशी अपेक्षा होती, मात्र भारतातील प्रमुख पेट्रोलियम कंपन्यांनी आपले दर स्थिर ठेवले आहेत. आज जाहीर करण्यात आलेल्या दरानुसार दिल्लीमध्ये पेट्रोलचा दर प्रति लिटर 103.97 तर डिझेल प्रति लिटर 86.67 रुपयांना मिळत आहे. कच्च्या तेलाच्या किमती कमी झाल्या असतानाही भारतामध्ये पेट्रोल, डिझेलचे दर स्थिरच राहिले आहेत. 

काही दिवसांपूर्वी केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलच्या उत्पादन शुल्कामध्ये कपात करण्याचा निर्णय घेतला होता. केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे भारतात पेट्रोल 10 रुपयांनी तर डिझेल 5 रुपयांनी स्वस्त झाले होते. त्यानंतर  राज्य सरकारने देखील आपल्या राज्यात पेट्रोलचे दर कमी करावेत असे आवाहन केंद्राकडून करण्यात आले होते. केंद्राच्या या आवाहानाला प्रतिसाद देत अनेक राज्यांनी हॅटमध्ये कपात करत आपल्या राज्यातील पेट्रोल आणि डिझेलचे दर काही प्रमाणात कमी केले.

पंजाबमध्ये सर्वात स्वस्त पेट्रल आणि डिझेल 
दरम्यान केंद्राने उत्पादन शुल्कात कपात करण्याचा निर्णय घेतल्यानंतर लगेच काही दिवसांमध्ये पंजाबच्या चन्नी सरकारने देखील आपल्या राज्यात पेट्रोलचे, डिझेलचे दर कमी केले. पंजाबमध्ये पेट्रोलचे दर तब्बल 11.27 रुपयांनी कमी करण्यात आले आहेत. त्यामुळे तेथील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. तर उत्तर प्रदेश सरकारने पेट्रोलच्या दरात प्रति लिटर 6.9 रुपयांची कपात केली आहे. विशेष म्हणजे पुढील वर्षी ज्या राज्यांमध्ये निवडणुका आहेत, त्या सर्व राज्यांनी काही प्रमाणात पेट्रोल, डिझेलचे दर कमी करून नागरिकांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे.