दुर्मिळ  'ओरंगुटन्स' माकडांची प्रजाती नामशेष होण्याच्या मार्गावर?

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

दुर्मिळ  'ओरंगुटन्स' माकडांची प्रजाती नामशेष होण्याच्या मार्गावर?
नवी दिल्ली - 
एक काळ असा होता की जेव्हा जग सर्व प्रकारच्या प्राण्यांनी परिपूर्ण होते. परंतु कालांतराने बरेच बदल होत गेले आणि हळूहळू बरेच प्राणी नामशेष झाले. आज आपण त्या नामशेष प्राण्यांबद्दल केवळ पुस्तकांमध्ये वाचतो किंवा चित्रपटात पाहतो.  आता माकडांची एक प्रजाती नामशेष होण्याच्या मार्गावर असल्याची भीती प्रणितज्ञांकडून व्यक्त केली जात आहे.  ही माकडे सोनेरी आणि तपकिरी केसांची असून ते माकडांची  दुर्मिळ प्रजाती म्हणून वर्गीकृत आहेत.  या माकडांना 'तपानुली ओरंगुटन्स' म्हणतात.  ते जगातील सर्वात जास्त मुस्लिम लोकसंख्या असलेल्या इंडोनेशियातील उत्तर सुमात्राच्या बटांग तोरू पर्वतांवरील जंगलात राहतात.  सुमात्रा हे इंडोनेशियातील एक बेट आहे.
तपानुली ओरंगुटानला 'द ग्रेट एप्स' म्हणूनही ओळखले जाते.  पूर्वी असे मानले जात होते की तपानुली ऑरंगुटान नामशेष होण्यास बराच काळ आहे, परंतु आता फार झपाट्याने त्यांची संख्या कमी होत असल्याचे दिसून आले आहे.  वास्तविक, मागील 200 वर्षांपासून त्यांचे वास्तव्याचे क्षेत्र दिवसेंदिवस लहान होत चालले आहे.
वृत्तानुसार, पूर्वी जंगलांच्या मोठ्या भागात रहाणारे तपानुली ओरंगुटन मोठ्या संख्येने होते, परंतु आता शिकारीमुळे ते बटांग तोरू पर्वताच्या केवळ तीन टक्के जंगलात राहतात आणि त्यांची संख्याही कमी झाली आहे. असे म्हटले जाते की सध्या या भागात 800 पेक्षाही कमी तपानुली ओरंगुटन्स शिल्लक आहेत.
मीडिया रिपोर्टनुसार संवर्धन शास्त्रज्ञ एरिक मेजार्ड यांचे म्हणणे आहे की जर अशा तपानुली ओरंगुटन्स शिकारीला  बळी पडत राहिले तर त्यांची प्रजाती लवकरच नष्ट होईल.  त्यांचा असा विश्वास आहे की येत्या 10 ते 15 वर्षांत, पृथ्वीवरून तपानुली ऑरंगुटन्स नष्ट होतील.
वृत्तानुसार, बटांग तोरू नदीवर जलविद्युत प्रकल्प उभारत असल्यामुळे तपानुली ऑरंगुटन अचानक नष्ट होण्याचा धोकाही वाढला आहे.  हा वीज प्रकल्प सुमारे 300 एकरांवर उभारण्यात येत आहे.  असे म्हटले जात आहे की यामुळे ऑरंगुटान टोळ्यांचे एकमेकांशी सहवासात येणे, एकत्र राहणे थांबेल, ज्यामुळे त्यांच्या प्रजननावरही परिणाम होईल.  यामुळे त्यांची संख्या वाढणार नाही आणि हे जीव नष्ट होण्याच्या मार्गावर पोहोचतील.  तथापि, या विद्युत प्रकल्पाचा असा दावा आहे की या माकडांच्या या प्रजातीसाठी त्यांच्यापासून कोणताही धोका नाही.