खबरदार, राज्यातील सुरक्षा धोक्यात आणली तर -  गृहमंत्री गरजले

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

खबरदार, राज्यातील सुरक्षा धोक्यात आणली तर -  गृहमंत्री गरजले

मुंबई, दि. ११ - कर्नाटकमध्ये सुरू असलेल्या हिजाब वादावरून महाराष्ट्रातलं वातावरण बिघडवू नका, नाहीतर कायदेशीर कारवाई करण्यात येईल अशी तंबी  दिलीप वळसे पाटील यांनी राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांना दिली आहे.

 

गेल्या काही दिवसांपासून देशभरात हिजाब प्रकरणावरून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. कर्नाटकच्या उडुपीमध्ये एका महाविद्यालयाने हिजाब घातलेल्या मुस्लीम मुलींना प्रवेश नाकारल्यानंतर त्यावरून वाद सुरू झाला आहे. मात्र, त्याचे पडसाद महाराष्ट्रात देखील उमटू लागले असून राजकीय पक्षांनी देखील यावरून आरोप-प्रत्यारोप सुरू केले आहेत.

 

दिलीप वळसे पाटील यांनी यावेळी हिजाब मुद्द्यावर आपली भूमिका स्पष्ट केली. “परराज्यातल्या एखाद्या मुद्द्यावर आपल्या राज्यातली शांतता बिघडवू नका”, असं आवाहन दिलीप वळसे पाटील यांनी यावेळी केलं. “जातीजातीमध्ये किंवा धर्माधर्मामध्ये आपण अनावश्यक संघर्ष करायला लागलो, तर समाजात एक दुही तयार होते. त्यामुळे हे आंदोलन शक्यतो करू नये. माझी सगळ्यांना विनंती आहे की सगळ्यांनी शांतता पाळण्यासाठी सहकार्य करावं”, असंही वळसे पाटील म्हणाले.

 

दरम्यान, यावेळी बोलताना गृहमंत्र्यांनी सामान्य नागरिकांसोबतच या मुद्द्यावरून राजकारण करणाऱ्या राजकीय पक्षांना देखील तंबी दिली. “जे मी सामान्य नागरिकांना सांगितलं तेच राजकीय पक्षांनाही सांगतो आहे. त्यांनी विनाकारण राज्यात या विषयावरून अस्वस्थता निर्माण करू नये आणि पोलीस विभागाचं काम वाढवू नये”, असं दिलीप वळसे पाटील म्हणाले.