एशिया कपसाठी अंडर 19 च्या टीमची घोषणा; ही आहे संपूर्ण 20 क्रिकेटर्सची यादी

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

एशिया कपसाठी अंडर 19 च्या टीमची घोषणा; ही आहे संपूर्ण 20 क्रिकेटर्सची यादी
मुंबई -

बीसीसीआयनं अंडर 19 एशिया कपसाठी 20 सदस्यीय टीमची घोषणा केली आहे. यातले काही स्टँडबाय खेळाडू आहेत. विशेष म्हणजे ह्या संघाचं नेतृत्व दिल्लीचा धडाकेबाज क्रिकेटपटू यश धूलकडे असेल. 23 डिसेंबरपासून आशियाई कप यूएईत खेळला जाणार आहे. त्यासाठी 20 क्रिकेटपटूंची निवड करण्यात आलीय. पण यूएईला जाण्यापूर्वी ह्या सगळ्यांना बंगळुरुत नॅशनल क्रिकेट अकादमीत स्वत:ला सिद्धही करावं लागेल. म्हणजेच ह्या अकादमीत एशिया कप तयारीचा कँप लागणार आहे. त्यामुळेच त्यासाठी 25 क्रिकेटपटूंची निवड करण्यात आलीय. त्यातले पाच हे स्टँडबाय असतील.

बीसीसीआयनं एक पत्रक प्रसिद्ध केले. ऑल इंडिया ज्यूनिअर सलेक्शन कमिटीनं येणाऱ्या एसीसी अंडर-19 एशिया कपसाठी 20 सदस्यांच्या टीमची घोषणा केली. एशिया कप हा यूएईमध्ये 23 डिसेंबरला खेळवला जाईल. त्याआधी बंगळुरुत 11 ते 19 डिसेंबर दरम्यान 25 जणांचा एक प्रिपेटरी म्हणजेच तयारीचा कँप लागेल. ह्या कँपमध्ये 25 खेळाडू भाग घेतील, असे या पत्रकात म्हटले आहे. 

एशिया कपचा कर्णधार म्हणून दिल्लीचा यश धुलची निवड होण्यामागे त्याची अलीकडची कामगिरी कारणीभूत ठरली आहे. त्याने विनोद मंकड ट्रॉफित यावर्षी सर्वाधिक रन्स ठोकल्या आहेत.  दिल्लीकडून त्यानं 75.50 च्या सरासरीनं 302 रन्स ओढल्यात. त्यामुळेच यश धुल हीच योग्य निवड असल्याची चर्चा आहे. एशिया कपसाठी अंडर 19 ची घोषणा केली असली तरीसुद्धा वेस्ट इंडिजमध्ये होणाऱ्या अंडर-19 वर्ल्डकपसाठीच्या संघाची घोषणा मात्र नंतर होणार असल्याची बीसीसीआयनं स्पष्ट केलंय. पुढच्या वर्षी जानेवारी फेब्रुवारीत हा वर्ल्ड कप खेळवला जाणार आहे. आतापर्यंत आठ एशिया कप टुर्नामेंट खेळवले गेलेत. त्यापैकी भारतानं 6 वेळा विजय मिळवलाय. तर 2012 साली भारतानं पाकिस्तानसोबत ट्रॉफी शेअर केली होती.

अंडर-19 एशिया कप टीम याप्रमाणे :
हरनूर सिंह पन्नू, अंगकृश रघुवंशी, अंश गोसाई, एसके रशिद, यश धूल (कप्तान), अन्नेश्वर गौतम, सिद्धार्थ यादव, कौशल तांबे, निशांत सिंधू, दिनेश बना, आराध्य यादव, रजनंड बावा, राजवर्धन हंगरगेकर, गर्व सांगवान, रवीकुमार, ऋषीथ रेड्डी, मानव परख, अमृत राज उपाध्याय, विकी ओस्तवाल, वसु वत्स

स्टँडबाय खेळाडू :
आयुषसिंह ठाकूर, उदय सहारन, शाश्वत दंगवाल, धनुष गौडा, पीएम सिंह