जर तुम्ही आधार नोंदणी क्रमांक विसरला असाल, तर 'हा' सोपा मार्ग वापरा !

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

जर तुम्ही आधार नोंदणी क्रमांक विसरला असाल, तर 'हा' सोपा मार्ग वापरा !

नवी दिल्ली - 

आधार कार्ड हे प्रत्येक भारतीयासाठी अत्यंत महत्त्वाचे दस्तऐवज आहे, म्हणजे त्याशिवाय कोणतेही काम पूर्ण होऊ शकत नाही. बँक खाते उघडण्यासाठी, सिमकार्ड घेण्यासाठी, कोणत्याही सरकारी सुविधेचा लाभ घेण्यासाठी, आपली ओळख उघड करण्यासाठी इ. तर अशी अनेक कामे केवळ आधारकार्डच्या माध्यमातून केली जातात. हे कार्ड युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडिया अर्थात UIDAI द्वारे जारी केले जाते, ज्यामध्ये 12 अंकी अद्वितीय क्रमांक असतो. परंतु अनेक वेळा असे दिसून येते की लोकांचे आधार कार्ड हरवते आणि त्यांच्याकडे त्यांचा आधार नोंदणी क्रमांक देखील नसतो. अशा परिस्थितीत त्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. यामुळे त्यांची अनेक कामे रखडली जातातमात्र आता काळजी नका करू. तुम्ही तुमचा आधार क्रमांक घरी बसल्या काही मिनिटांत मिळवू शकता. चला तर मग जाणून घेऊया संपूर्ण प्रक्रियेबद्दल. 

० असा आहे मार्ग- 
१. प्रथम तुम्हाला resident.uidai.gov.in या वेबसाइटला भेट द्यावी लागेल, जी UIDAI ची अधिकृत वेबसाइट आहे. येथे तुम्हाला My Aadhar पर्यायावर क्लिक करावे लागेल.
२. यानंतर, तुम्हाला तळाशी दिलेल्या आधार सेवा विभागात जावे लागेल आणि समोरच्या उघडलेल्या गोष्टींमधून Retrieve Lost or Forgotten EID किंवा UID वर क्लिक करावे लागेल.
३. यावर क्लिक केल्यानंतर, तुम्हाला तुमची काही महत्त्वाची माहिती विचारली जाईल, जी तुम्हाला येथे भरायची आहे आणि त्यानंतर Send OTP या पर्यायावर क्लिक करा.
४. यानंतर तुमच्या नोंदणीकृत मोबाइल क्रमांकावर (आधार कार्डशी जोडलेला मोबाइल क्रमांक) वर एक ओटीपी येईल, तो भरावा लागेल आणि त्यानंतर कॅप्चा कोड भरून लॉग इन करावे लागेल. यानंतर तुमचा आधार कार्डचा नोंदणी क्रमांक तुमच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर येईल. तथापि, जर तुमचा मोबाईल नंबर नोंदणीकृत नसेल, तर तुम्हाला तुमच्या जवळच्या कायमस्वरूपी नावनोंदणी केंद्राला भेट द्यावी लागेल.