कामावर हजर एसटी कर्मचाऱ्यांच्या खात्यात तब्बल  41 टक्क्यांची वाढीव पगार जमा ; संपकरी पगाराविना 

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

कामावर हजर एसटी कर्मचाऱ्यांच्या खात्यात तब्बल  41 टक्क्यांची वाढीव पगार जमा ; संपकरी पगाराविना 
मुंबई -
राज्य सरकारने केलेल्या घोषणेनुसार 41 टक्के पगारवाढीसह 19 हजार एसटी कर्मचाऱ्यांच्या खात्यात आज पगार जमा झाले आहेत. मात्र संपावरील एसटी कर्मचाऱ्यांचा पगार जमा करण्यात आला नाही. एसटी संपकरी कर्मचार्‍यांच्या आंदोलनाला प्रतिसाद देताना परिवहन मंत्री अनिल परब यांनी केलेल्या घोषणा प्रमाणे एसटी कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे महागाई भत्ता 12% वरून 28% करण्यात आला, घरभाडे भत्ता 8-16-24 या पटीत वाढवून देण्यात आला. तसेच अंतरिम वेतन वाढ देखील दिली. अशी माहिती देण्यात आली आहे. तर जे कर्मचारी संपावर आहेत त्याचे पगार झाले नाहीत. अजूनही जवळपास 72 हजार एसटी कर्मचारी संपावर आहेत.

राज्यात दुपारपर्यंत 250 पैकी 123 डेपोमध्ये वाहतूक सुरू झाली आहे. रात्री उशिरापर्यंत हा आकडा आणखी वाडण्याची शक्यता आहे. तर संप चिघळल्याने आजही काही ठिकाणी एसटीवर दगडफेक झाल्याच्या घटना घडल्यााचं समोर आलं आहे. काही ठिकाणी वाहतूक सुरू करताना मोठा पोलीस बंदोबस्त लावल्याचंही पहायला मिळालं. राज्यात निलंबित कर्मचाऱ्यांची संख्याही जवळपास 10 हजारांच्या आसपास गेली आहे, तर सेवासमाप्तीची कारवाई झालेल्या कर्मचाऱ्यांची संख्याही तब्बल 2 हजारांच्या वर गेली आहे.