बँक फोडण्याचा प्रयत्न करणाऱ्या चौघांना अटक
A PHP Error was encountered
Severity: Notice
Message: Undefined property: stdClass::$link
Filename: post/_post_share_box.php
Line Number: 27
Backtrace:
File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler
File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post
File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once
पिंपरी , (प्रबोधन न्यूज ) - थेरगाव येथील डांगे चौकाजवळ असलेल्या फेड बँक फोडण्याचा प्रयत्न करणाऱ्या चौघांना पोलिसांनी अटक केली. त्यांचे इतर चार साथीदार पळून गेले असून त्यांच्या मागावर पोलीस पथके रवाना करण्यात आली आहेत. ही घटना रविवारी (दि. 9) रात्री दीड वाजता घडली.
पोलीस उपायुक्त डॉ. काकासाहेब डोळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांच्या डायल 112 या हेल्पलाइन क्रमांकावर रविवारी मध्यरात्री दीड वाजताच्या सुमारास डांगे चौक थेरगाव येथून कॉल आला. कॉल वरील व्यक्तीने काही जण बँक फोडण्याचा प्रयत्न करत असल्याचे सांगितले. त्यानुसार मार्शल वरील दोन पथकांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी फेड बँकेच्या शेजारी असलेल्या एका दुकानाचे शटर उचकटून आठ जण बँकेची भिंत पाडण्याचा प्रयत्न करत होते. दरोडेखोरांनी बँकेची भिंत पोखरली असता त्यांना पोलीस आल्याची चाहूल लागली. पोलीस दिसतात दरोडेखोरांनी पोलिसांवर सशस्त्र हल्ला केला. त्यावेळी पोलिसांनी चार दरोडेखोरांना पकडले. मात्र अन्य चार जण पळून गेले.
दरोडेखोरांचा प्रतिकार करत असताना वाकड पोलीस ठाण्यातील एक पोलीस अंमलदार जखमी झाले. आरोपींकडून बँक फोडणेसाठी लागणारे गॅस कटर, गॅस सिलेंडर, स्क्रू ड्रायव्हर, लोखंडी अवजारे, भिंत फोडण्यासाठीचे गिरमीट असे साहीत्य जप्त करणेत आले आहे. असून अधिक तपास करीत आहोत. पळून गेलेल्या चार दरोडेखोरांच्या मागावर स्थानिक पोलिसांची दोन पथके रवाना केली आहेत.