चिंचवड पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकास लाच घेताना पकडले

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

चिंचवड पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकास लाच घेताना पकडले

पिंपरी-चिंचवड, दि. 26 मे - भावाच्या पत्नीचे पोस्ट मार्टम रिपोर्ट्स आणि इतर कागदपत्रे देण्यासाठी चिंचवड पोलीस ठाण्यातील एएसआयने 50 हजारांची लाच मागितली. त्यातील पाच हजार रुपये अॅडव्हान्स स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) एएसआयला रंगेहाथ पकडले. ही कारवाई बुधवारी (दि. 25) वाल्हेकरवाडी पोलीस चौकीत करण्यात आली.

विठ्ठल अंबाजी शिंगे (वय 57) असे लाच घेतलेल्या सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकाचे (एएसआय चे) नाव आहे. याप्रकरणी 36 वर्षीय व्यक्तीने चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

एसीबीने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांच्या भावाविरुद्ध चिंचवड पोलीस ठाण्यात तक्रारी अर्ज आला आहे. तसेच तक्रारदार यांच्या भावाच्या पत्नीचे पोस्ट मार्टम रिपोर्ट्स आणि इतर कागदपत्रे तक्रारदार यांना हवी होती. त्यासाठी त्यांनी पोलिसांना विनंती केली. मात्र आरोपी एएसआयने तक्रारदार यांच्याकडे 50 हजार रुपये लाचेची मागणी केली.

तक्रारदार यांनी तडजोड करून 25 हजार रुपये देण्याचे ठरवले. दरम्यान तक्रारदार यांनी एसीबीकडे याप्रकरणी तक्रार केली. तडजोड केलेल्या लाच रकमेतील पाच हजार रुपये अॅडव्हान्स म्हणून बुधवारी देण्याचे ठरले. वाल्हेकरवाडी पोलीस चौकीत ही लाच देण्यात येणार असल्याने एसीबीने पोलीस चौकीत सापळा लावला.

तक्रारदार यांच्याकडून पाच हजार रुपये अॅडव्हान्स लाच घेताना आरोपी एएसआय एसीबीच्या जाळ्यात रंगेहाथ अडकला. एसीबी पुणे युनिटचे पोलीस निरीक्षक श्रीराम शिंदे या गुन्ह्याचा तपास करीत आहेत.