एसटी कर्मचाऱ्यांच्या तीन टक्के वेतनवाढीचे परिपत्रक : कामावर हजर कर्मचाऱ्यांचा 10 डिसेंबरपर्यंत होणार पगार
A PHP Error was encountered
Severity: Notice
Message: Undefined property: stdClass::$link
Filename: post/_post_share_box.php
Line Number: 27
Backtrace:
File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler
File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post
File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once
पगारवाढीनंतरही गेल्या 22 दिवासांपासून एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. विलीनीकरणाच्या मुद्द्यावर कामगार अडून बसले आहेत. तर दुसरीकडे सरकारने निलंबनाच्या कारवाईचा बडगा उगारला आहे. आतापर्यंत 8195 कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आलं आहे. तर, 1827 लोकांची सेवा समाप्त करण्यात आली आहे. राज्यातील विविध भागातून कर्मचारी आझाद मैदानात आले आहेत. जोपर्यंत विलणीकरण होत नाही तो पर्यंत जाणार नाही या भूमिकेवर कर्मचारी ठाम आहेत. आज मुंबईत पाऊस पडत आहे तरी एसटी कामाचारी निर्णयावर ठाम असून मैदानात ठाण मांडून आहेत. जोपर्यंत विलीनीकरण होत नाही तोपर्यंत हटणार नाही असा निर्धार या कर्मचाऱ्यांनी केला आहे.
एसटीतील प्रशासकीय विभागात नऊ हजार 426 कर्मचारी आहेत. त्यापैकी नऊ हजार 53 कर्मचारी कामार आले आहेत. तर 373 कर्मचारी संपात आहेत. कार्यशाळा विभागात एकूण 17 हजार 560 कर्मचारी आहेत. त्यापैकी पाच हजार 488 कर्मचारी कामावर परतले आहेत. तर 12 हजार 72 कर्मचारी संपात आहेत. एसटीत 37 हजार 225 चालक आहेत. त्यापैकी 2 हजार 271 चालक कामावर आले आहेत. तर 34 हजार 954 चालक संपात आहेत. तसेच एसटीत एकूण 28 हजार 55 वाहक असून त्यापैकी दोन हजार 274 वाहक कामावर आले आहेत. तसेच 25 हजार 781 वाहक संपात आहेत.