A PHP Error was encountered
Severity: Notice
Message: Undefined property: stdClass::$link
Filename: post/_post_share_box.php
Line Number: 27
Backtrace:
File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler
File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post
File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once
मुंबई -
सात वर्षात मोदी सरकार सत्तेवर आल्यावर त्यांनी मुंबईतील आस्थापना गांधीनगरला गेल्या. त्यामुळे महाराष्ट्राचं बरंच नुकसान झालं आहे. जे लोक बोट दाखवतात त्यांनी स्वतःचे आत्मपरीक्षण केले पाहिजे. महाराष्ट्र हा महाराष्ट्रच आहे. आर्थिक राजधानी ही मुंबईच राहणार. कितीही कुणी स्वप्न पाहिले तरी गांधीनगर ही देशाची आर्थिक राजधानी होणार नाही, असा पलटवार राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला.
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांनी आपल्या तीन दिवसाच्या मुंबई दौऱ्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार, शिवसेना खासदार संजय राऊत आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांची भेट घेतली. त्याचबरोबर ममता यांनी मुंबईतील उद्योगपतींच्याही भेटीगाठी घेतल्या. ममता यांनी घेतलेल्या उद्योगपतींच्या भेटीगाठीवरुन भाजप आमदार आशिष शेलार यांनी राज्यातील उद्योग पश्चिम बंगालमध्ये न्यायचा तर डाव नाही ना? असा सवाल भाजप नेते आशिष शेलार यांनी केला होता. शेलारांच्या या टीकेला अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. मुंबई ही भारताची आर्थिक राजधानी आहे. इथं सगळेजण येत राहतात पण कधी कुणी कट-कारस्थान करुन इथले उद्योग बाहेर गेले नाहीत. ‘खोटं बोलण्यात भाजपची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद होईल’खोटं बोलण्यात भाजपची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद होऊ शकते, असा टोलाही मलिक यांनी लगावला आहे. इतर लोकं खोटं बोलतात हे भाजपने बोलणं हास्यास्पद असून खोटं बोला पण रेटून बोला हा भाजपच्या लोकांचा उद्योगच आहे, असा आरोपही त्यांनी केलाय. जे स्वतः खोटं बोलण्याचा उद्योग करतात त्यांना दुसर्यांकडे बोट दाखवण्याचा अधिकार नाही, असंही मलिक म्हणाले.
आशिष शेलार यांनी पत्रकार परिषद घेऊन ममता बॅनर्जींच्या दौऱ्यावर काही प्रश्न उपस्थित केले होते. ममता बॅनर्जी यांची आदित्य ठाकरे यांनी काल भेट घेतली. मुख्यमंत्र्यांच्या वतीने ही भेट आपण घेतल्याचे आदित्य ठाकरे यांनी जाहीर केले आहे. या गुप्त बैठकीमध्ये कटकारस्थान तर नाही ना शिजलं? असा सवाल शेलार यांनी केला. ममतादिदी महाराष्ट्रातील उद्योगांना आपल्या राज्यात यायचे आमंत्रण देण्यासाठी आल्या आहेत. देशभर सर्वत्र उद्योगधंदे असले पाहिजे हीच भाजपाची भूमिका आहे. मात्र आपल्या राज्यातील उद्योग तुम्ही घेऊन जा, असे महाराष्ट्रातील सत्ताधारी शिवसेना दिदींना सांगते आहे काय? हा प्रश्न आहे. महाराष्ट्रातील रोजगार, व्यवसाय, इंडस्ट्रीज इथून घेऊन जाण्यास सत्ताधारी शिवसेना ममतादिदींना मदत करते आहे काय? महाराष्ट्रात कँग्रेसला ना स्थान, ना इज्जत, ना किंमत, ना स्थिती त्यामुळे काँग्रेसला काय ते त्यांचे त्यांनी ठरवावे. आमचा सवाल महाराष्ट्राचा आहे. महाराष्ट्रातील उद्योग पश्चिम बंगालला पाठवून महाराष्ट्रातील तरुणांना केवळ वडापाव विकायला सांगणार आहात काय?, असा संतप्त सवाल त्यांनी केला होता.