संशोधन व नवनवीन कल्पनांना जगाची सर्व दारे मराठी तरुणांना उघडी

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

संशोधन व नवनवीन कल्पनांना जगाची सर्व दारे मराठी तरुणांना उघडी
संशोधन व नवनवीन कल्पनांना जगाची सर्व दारे मराठी तरुणांना उघडी

१८ वे जागतिक मराठी संमेलन सुरू

पिंपरी - परदेशात १८ वे जागतिक मराठी संमेलन व व्यवसायाला अनेकविध संधी महाराष्ट्रातील मराठी तरुणांना असून संशोधन व नावीन्यपूर्वक कल्पनांसाठी जगाची दारे उघडी असल्याची भावना परदेशस्थ यशस्वी मराठी मान्यवरांनी परिसंवादात व्यक्त केली.

  जागतिक मराठी अकादमी आणि डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ, पिंपरी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित १८ व्या जागतिक मराठी संमेलनामध्ये समुद्रापलीकडे-भाग १ या कार्यक्रमात हा सूर प्रकट झाला. डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपती व या संमेलनाचे स्वागताध्यक्ष डॉ. पी. डी. पाटील यांच्या प्रमुख उपस्थित झालेल्या परिसंवादात प्रेक्षकांनी मोठी गर्दी केली होती.

मनोज शिंदे (अमेरिका), भारत गिते (जर्मनी), रोहिदास आरोटे(दक्षिण कोरिया), विद्या जोशी(अमेरिका), सागर बाबर(युरोप), मिहीर शिंदे(ऑस्ट्रेलिया) हे मान्यवर या परिसंवादात सहभागी झाले होते.

जागतिक मराठी अकादमीचे सदस्य सचिन इटकर यांनी या सर्वांशी मुक्त संवाद साधला. तेलंगणा राज्यातील हैद्राबाद येथील पोलीस आयुक्त महेश भागवत हे प्रमुख म्हणून उपस्थित होते .

  आपापल्या क्षेत्रात यशस्वी शिखरे गाठत असताना भारतभूमीतील आपल्या मराठी बांधवांना विविध संधी व दालने जागभरात कशी उपलब्ध आहेत याची सर्वानी याप्रसंगी माहिती दिली.

ऑस्ट्रेलियातील मिहीर शिंदे यांनी, गुणवंतांना ऑस्ट्रेलिया हा देश सतत खुणावत असतो. जगाच्या बाजारपेठेत ज्ञानाला कमी परंतु आयडिया (कल्पना) यांना जास्त महत्त्व आले आहे. त्याचबरोबर संशोधनपर शिक्षण घेतलेल्यांना ऑस्ट्रेलियामध्ये सदैव संधी असुन मराठी तरुणांनी शिक्षण घेऊन फक्त येथे या त्याचे पालकत्त्व घेण्यास आपण तयार असल्याचे म्हटले.

सागर बाबर यांनी आपले अनुभव सांगताना विज्ञान, तंत्रज्ञान व बुद्धिमत्ता हे तीन यशाचे दरवाजे असून व्यवस्थापन करण्याचे शास्त्र हे आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी दाखवून दिले असल्याने त्याचा आदर्श घ्यावा असे नमूद केले.

  रोहिदास आरोटे यांनी, भारतातील विद्यापीठे व कोरियामधील विद्यापीठांनी संशोधन करार केल्यास जगभरात त्याचे महत्त्व वाढणार आहे. डीएनए च्या संशोधनामध्ये आपण केलेला अभ्यास हा जगभरातील विद्यार्थ्यांसाठी पायाभूत प्रकल्प ठरला असल्याचे म्हटले.

अमेरिकेतील सर्वात मोठी संस्था म्हणून बृहनमहाराष्ट्र मंडळ असून, शिकागो येथे मराठी शाळा सुरु केल्यानंतर ९० विद्यार्थी मराठीचे शिक्षण घेत असल्याचे त्यांनी म्हटले. मराठी युवक-युवतींनी आंधळेपणाने अनुकरण न करता मराठी तरुणांसाठी अमेरिकेत प्रचंड संधी असल्याचे त्यांनी सांगितले. या कार्यक्रमाला प्रेक्षकांनी मोठा प्रतिसाद दिला.