काँग्रेस खासदारांच्या भ्रष्टाचाराच्या निषेधार्त पिंपरी, चिंचवड, भोसरीत भाजपाचे आंदोलन  

 

पिंपरी,  (प्रबोधन न्यूज )  -  आयकर विभागाने ६ डिसेंबर २०२३ रोजी मद्य निर्मिती कंपनी बलदेव साहू आणि समूहाच्या झारखंड आणि ओडिशामधील 10 ठिकाणी छापे टाकले. आयकर विभागाने बोलंगीर कार्यालयापासून ३० किमी अंतरावर असलेल्या बलदेव साहू कंपनीच्या सातपुडा कार्यालयावर छापा टाकून २०० कोटी रुपयांची रोकड जप्त केली आहे. काँग्रेसकडून सूरू असलेल्या या भ्रष्टाचाराच्या निषेधार्त भाजपा पिंपरी चिंचवड शहर (जिल्हा)च्यावतीने साहू यांच्या पुतळयाचे दहन करून आंदोलन करण्यात आले. तसेच, घोषणाबाजी करून या प्रकाराचा निषेध नोंदविण्यात आला. भाजपा शहराध्यक्ष शंकर जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पिंपरी विधानसभेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, बोपखेड गणपती मंदीर, चिंचवड विधानसभेत पिंपळे गुरव सृष्टी चौक, भोसरी विधानसभा घरकुल, मोशी येथे आंदोलन पार पडले.

यावेळी, महिला मोर्चा अध्यक्षा सुजाता पालांडे, वरिष्ठ उपाध्यक्ष राजू दुर्गे, सरचिटणीस नामदेव ढाके, संजय मंगोडेकर, प्रदेश सचिव कविता हिंगे, वैशाली खाडये, माजी नगरसेवक सागर अंघोळकर, मोरेश्वर शेडगे, सार्थ पालांडे, संतोष तापकीर, सतीश नागरगोजे, देवदत्त लांडे, मनोज ब्राम्हणकर, नंदू कदम, बाळासाहेब भुंबे, धनंजय शाळीग्राम, मुकेश पुडासमा, दिपक भंडारी, बाळासाहेब भुंबे, विजय ‍शिनकर, अलका मकवाना, दिपाली तारसकर, मंगल आढाव, लक्ष्मी काची, जयश्री मकवाना, कोमल शिंदे, दिपाली कलापुरे, विद्या माळी, जयश्री वाघमारे, रेखा काटे, ‍विमल काळभोर, दिपाली केंगारे, विजयश्री नन्नावरे, रोहीणी रासकर ‍निलम दळवी, पल्लवी पाठक, कमलेश बाहरवाल, निता कुशारे, अंजली पांडे, चेतना मुंदाणकर, श्रीमती ‍मिनल आदी पदाधिकारी उपस्थित होते.