कृष्ण प्रकाश यांच्या बदलीची चौकशी करा; अन्यथा न्यायालयात जाणार : बाबा कांबळे
A PHP Error was encountered
Severity: Notice
Message: Undefined property: stdClass::$link
Filename: post/_post_share_box.php
Line Number: 27
Backtrace:
File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler
File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post
File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once
सर्वसामान्य लोकांचे प्रश्न सोडवून त्यांना न्याय देणारे आयुक्त - मानव कांबळे
कृष्णप्रकाश यांच्या समर्थनार्थ शहरातील 50 सामाजिक संघटना एकवटल्या
पिंपरी, दि. 17 मे - आयपीएस पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांच्या बदलीची चौकशी करा, अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे करणार असल्याचे महाराष्ट्र कष्टकरी पंचायतीचे अध्यक्ष बाबा कांबळे यांनी केली. तसे न झाल्यास न्यायालयात दाद मागणार असल्याचे बाबा कांबळे म्हणाले. तर पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश हे सर्वसामान्य लोकांचे प्रश्न सोडवून त्यांना न्याय देणारे आयुक्त असल्याचे सामाजिक कार्यकर्ते मानव कांबळे म्हणाले.
पिंपरी चिंचवडचे तत्कालीन पोलिस आयुक्त कृष्णप्रकाश यांच्या समर्थनासाठी पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिक, सामाजिक व राजकिय पक्ष एकवटले आहेत. पिंपरी-चिंचवड शहरातील 50 पेक्षा अधिक पक्ष व सामाजिक संघटनांनी पत्रकार परिषद घेऊन कृष्ण प्रकाश यांच्या कामाचे केले कौतुक केले. तसेच त्यांना पाठिंबा दर्शविला.
मानव कांबळे म्हणाले की, पोलिस आयुक्त कृष्णप्रकाश यांनी लोकाभिमुख प्रक्रिया राबविली. सर्वसामान्य लोकांना न्यायप्रक्रियेत त्यांनी संधी दिली. त्या माध्यमातून पुढाकाराचे कार्यक्रम राबविले. संविधानाचे आधार शाबूत राहावेत यासाठी कृष्णप्रकाश यांनी सर्वसामान्य लोकांच्या हिताचे काम केले. सध्या त्यांच्यावर वैयक्तिक हेवेदावे करून अर्ज केले जातात. सामान्य माणसाला भेडसावणाऱ्या प्रश्नांकडे लक्ष दिले. त्यांच्यामुळे सामान्य माणसांचे प्रश्न सुटले हा आमचा दावा असल्याचे मानव कांबळे म्हणाले.
गुन्हेगारी पार्श्वभूमीचे राजकारणी, बॅंकेचे संचालक व लॅंड माफियांच्या अभद्र युतीने कृष्ण प्रकाश यांच्या बदलीसाठी १०० कोटीपेक्षा अधिकचा व्यवहार केला आहे. गृहमंत्र्यांनी या प्रकरणी निवेदन करुन खरी वस्तुस्थिती जनतेसमोर आणावी व दबावातून केलेली बदली रद्द करावी. तसेच व्हायरल पत्रासंदर्भात गुन्हा दाखल करण्यास का टाळाटाळ केली जात आहे ? या बाबत विद्यमान पोलीस आयुक्तांनीही निवेदन करावे तसेच सदर अनुषंगाने या पत्राद्वारे आंबेडकरी कार्यकर्त्यांची बदनामी करणारा मजकूर प्रसारीत केल्यामुळे यात ॲट्रोसीटी कायद्यान्वये गुन्हा दाखल करावा अशी भूमिका रिपब्लिकन युवा मोर्चाचे नेते राहुल डंबाळे यांनी केली आहे.
बाबा कांबळे म्हणाले की, मुंबई पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांना 100 कोटी वसुलीचे टार्गेट दिले म्हणून तत्कालीन गृहमंत्री जेलमध्ये आहेत. पिंपरी-चिंचवड शहराचे माजी पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांच्यावर देखील अशाप्रकारे वसुलीचे टार्गेट होते का ? किंवा राजकीय फायद्याचे कामासाठी दबाव होता का ? त्यांच्याकडून काही चुकीचे कामे करुन घेण्याचा प्रयत्न प्रस्थापित राजकीय पक्षांनी केली होती का ? कृष्ण प्रकाश यांनी असे चुकीचे काम करण्यास नकार दिला म्हणून अचानकपणे त्यांची उचलबांगडी करून निवडणुकीच्या तोंडावर त्यांची तडकाफडकी बदली करण्यात आली, यामागचे नेमके कारण अजूनही पुढे आलेले नाही. 200 कोटींचा गैरव्यवहार कथित बॉम्ब लेटर वरून त्यांना बदनाम करून त्यांची प्रतिमा मलिन केली जात आहे. पोलीस, शहरातील पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते यांची प्रतिमा मलीन करण्याचे काम सध्या सुरू आहे.
त्या पत्राचा आधार घेत कृष्ण प्रकाश व शहरातील पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते यांना नाहक बदनाम केले जात आहे. यामुळे या पत्राची चौकशी करून सत्य परिस्थिती जनतेला कळली पाहिजे. याबरोबरच पोलिस आयुक्त कृष्णप्रकाश यांच्या बदलीचे नेमके कारण काय याबाबत देखील चौकशी झाली पाहिजे. यासाठी मुख्यमंत्र्यांना निवेदन देऊन मागणी करणार आहे. चौकशी न झाल्यास मा. न्यायालयात पिटीशन दाखल करणार, अशी मागणी कष्टकरी जनता आघाडी अध्यक्ष कष्टकऱ्यांचे नेते बाबा कांबळे यांनी केले.
या वेळी, बाबा कांबळे (अध्यक्ष, कष्टकरी जनता आघाडी), कष्टकऱ्यांचे नेते, मानव कांबळे, (ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते/अध्यक्ष, नागरी हक्क सुरक्षा समिती), राहुल डंबाळे (रिपब्लिकन युवा मोर्चा), धनराज चरणदास बिर्दा (नगरसेवक पिंपरी चिंचवड म.पालिका, उपाध्यक्ष राष्ट्रीय वाल्मिकी समाज), अजिज शेख (महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष, वाहतूक आघाडी रिपाई), अंकुश कानडी (नगरसेवक पिं.चिं महानगरपालिका), अनिल जाधव (प्रदेश उपाध्यक्ष वंचित बहुजन आघाडी), संतोष निसर्गंध (अध्यक्ष बहुजन सम्राट सेना), रफिक कुरेशी (समाजवादी पार्टी पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष), शिवशंकर उबाळे (शिवशाही युवा संघटना), सतीश काळे (संभाजी ब्रिगेड शहराध्यक्ष), धनाजी येळकर (छावा संघटना संस्थापक अध्यक्ष), आशा कांबळे (अध्यक्ष, घरकाम महिला सभा), दत्तात्रय शिंदे (राष्ट्रीय चर्मकार संघ पिंपरी चिंचवड शहर), रविन्दर सिंह (माहिती अधिकार कार्यकर्ते, अध्यक्ष, अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरोधी समिती), हमीद शेख (आपना वतन संघटना), राजश्री शिरवळकर (अपना वतन संघटना), फातिमा अन्सारी (मानव अधिकारी), सविता पाटील (महिला सुरक्षा फाउंडेशन ऑफ इंडिया), देवशाला लक्ष्मण साळवे (सोशल वर्कर), कृष्णा आदमाने (महाराष्ट्र संघर्ष सेना संस्थापक अध्यक्ष) आदी उपस्थित होते.