ओटीटीवरील सध्याचे 'हे' पाच सर्वोत्कृष्ट चित्रपट आहेत 'मस्ट वॉच'!

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

ओटीटीवरील सध्याचे 'हे' पाच सर्वोत्कृष्ट चित्रपट आहेत 'मस्ट वॉच'!
मुंबई - 
ओटीटी (OTT) प्लॅटफॉर्मवर चित्रपट आणि वेब सिरीज पाहण्याची क्रेझ वाढत आहे. हेच कारण आहे की आता अधिकाधिक चित्रपट आणि वेब सिरीज फक्त OTT वर प्रदर्शित होत आहेत. करोनाची दुसरी लाट थांबल्यानंतर देशातील अनेक भागातील चित्रपटगृहे 100 टक्के क्षमतेने सुरू झाली असली तरी OTT ची लोकप्रियता कमी झालेली नाही. कार्तिक आर्यनचा 'धमाका' हा चित्रपट गेल्या दिवशी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला. या चित्रपटात कार्तिकसोबत मृणाल ठाकूर आहे. याआधीही असे काही चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित झाले आहेत जे तुम्ही जरूर पहा. चला तर मग ओटीटीवर नुकतेच प्रदर्शित झालेल्या या पाच सर्वोत्तम चित्रपटांवर एक नजर टाकूया. 

१. रश्मी रॉकेट - झी 5
अभिनेत्री तापसी पन्नूचा चित्रपट 'रश्मी रॉकेट' हा झी ५ (Zee ५) वर प्रदर्शित झाला होता. 'रश्मी रॉकेट' चित्रपटात तापसी शिवाय श्वेता त्रिपाठी, अभिषेक बॅनर्जी, प्रियांशू पैन्युली आणि सुप्रिया पाठक यांच्याही मुख्य भूमिका आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन आकर्ष खुराणा यांनी केले आहे. प्रेक्षकांना हा चित्रपट खूप आवडला. तुम्ही हा चित्रपट अजून पाहिला नसेल तर नक्की पहा.

२. सरदार उधम - अमेझॉन प्राईम व्हिडीओ 
हा विकी कौशल स्टारर चित्रपट अमेझॉन प्राईम व्हिडीओवर ( Amazon Prime Video) प्रदर्शित झाला होता. 'सरदार उधम' या चित्रपटाला प्रेक्षक आणि समीक्षकांमध्ये चांगलीच पसंती मिळाली आहे. त्याच वेळी, चित्रपटाच्या स्टार कास्ट आणि निर्मात्यांनी देखील यावर खूप मेहनत घेतली आहे, जी चित्रपटात देखील स्पष्टपणे दिसून येते.

३. जय भीम - अमेझॉन प्राईम व्हिडीओ 
सुर्याच्या या चित्रपटाची प्रशंसा करावी तितकी कमी आहे. ज्यांनी आजपर्यंत हा चित्रपट पाहिला नसेल त्यांच्यापैकी तुम्ही असाल तर उशीर करू नका. हा चित्रपट पाहत या वीकेंडचा आनंद नक्की घ्या. या चित्रपटाचे समीक्षकांनी भरभरून कौतुक केले आहे.

४. मीनाक्षी सुंदरेश्वर - नेटफ्लिक्स
'मीनाक्षी सुंदरेश्वर' हा चित्रपट एका नवविवाहित जोडप्याची कथा सांगते. लांब अंतरावरील नातेसंबंध, करिअरच्या निवडी आणि त्यांच्या मार्गात येणाऱ्या इतर अनेक आव्हानांचा शोध घेते. सान्या मल्होत्रा ​​आणि अभिमन्यू दासानी अभिनीत हा चित्रपट तुम्ही नेटफ्लिक्सवर पाहू शकता.

५. हम दो और हमारे दो - डिज्नी प्लस हॉटस्टार
बॉलीवूड अभिनेता राजकुमार राव आणि क्रिती सेनन यांचा चित्रपट 'हम दो और हमारे दो' डिस्ने प्लस हॉटस्टारवर पाहता येणार आहे. राजकुमार राव आणि क्रिती सॅनन व्यतिरिक्त, या कॉमेडी रोमँटिक चित्रपटात परेश रावल, रत्ना पाठक आणि अपारशक्ती खुराना देखील आहेत.