कुणबी प्रमाणपत्र मागितले तर आक्षेप का? जरांगेंचा खडा सवाल
A PHP Error was encountered
Severity: Notice
Message: Undefined property: stdClass::$link
Filename: post/_post_share_box.php
Line Number: 27
Backtrace:
File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler
File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post
File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once
राजगुरुनगर , (प्रबोधन न्यूज ) - "आपला आजोबा, पणजोबा, खापर पणजोबा, कुणबी शब्द वापरायचे. कुणबी म्हणजे शेत, शेती. त्यात सुधारणा झाली आणि 'शेती' हा शब्द आला. मग कुणबी प्रमाणपत्र मागितले तर त्यावर आक्षेप का? असा सवाल मनोज जरांगे पाटील यांनी उपस्थित केला. मराठा आणि कुणबी यांच्यात फरक आहे. दोन्हीही वेगवेगळे आहेत. पण जरांगे पाटील मराठा आणि कुणबी एकच आहेत, असे म्हणतात. जरांगेंनी जातीचा आणि घटनेचा अभ्यास करावा', असा सल्ला केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी जरांगे यांना दिला होता. राणे यांच्या या सल्ल्याला आपल्या भाषणातून जरांगेनी एकप्रकारे उत्तर दिले.
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगेंची आज (दि.२०) पुण्यातील राजगुरुनगर येथील खेडमध्ये सभा झाली. या वेळी ते बोलत होते. जरांगे म्हणाले, आम्ही आरक्षण मागितले. सरकारने एक महिन्याचा वेळ मागितला, पण आपण ४० दिवसांचा वेळ दिला. आता सरकारला आरक्षण द्यावेच लागणार, हे माहिती आहे. कायदा पारित करण्यासाठी समितीही कामाला लागली. आता आरक्षण मिळेपर्यंत मागे हटायचे नाही.
जरांगे पाटील म्हणाले, मराठ्यांचे दोन प्रकार पहिला म्हणजे क्षत्रिय मराठा आणि दुसरा मराठा शेती करतो, शेतात राबतो, कष्ट करतो. मग मराठ्यांची पोटजात कुणबी होत नाही का, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. प्रत्येक घरातील व्यक्तीला आरक्षण माहिती होणे गरजेचे आहे. सरकारने आरक्षणाचा विषय गांभीर्याने घ्यावा. सरकारने आरक्षण वेळेत दिले असते तर आत्महत्या झाल्या नसत्या, अशी खंतही त्यांनी या वेळी व्यक्त केली.