हनुमान चालिसा, मनसे आंदोलन, धरपकड, राणा दांपत्य जामीन.....

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

हनुमान चालिसा, मनसे आंदोलन, धरपकड, राणा दांपत्य जामीन.....
हनुमान चालिसा, मनसे आंदोलन, धरपकड, राणा दांपत्य जामीन.....
हनुमान चालिसा, मनसे आंदोलन, धरपकड, राणा दांपत्य जामीन.....
हनुमान चालिसा, मनसे आंदोलन, धरपकड, राणा दांपत्य जामीन.....

मुंबई, दि. ४ मे - मशिदींवरील भोंग्यांवरून राज्यभरात आज मनसे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. त्यामुळे पोलिसांकडूनही ठिकठिकाणी मनसे कार्यकर्त्यांची धरपकड सुरू आहे. राज ठाकरे आज दुपारी पत्रकार परिषद घेणार आहेत. आजच्या अल्टिमेटमच्या पार्श्वभूमीवर राज्यभरात पोलिसांचा तगडा बंदोबस्त आहे. अनेक ठिकाणी राज्यात मशिदींनी आवाजाची मर्यादी पाळली आहे.

कल्याण, पनवेल, मुंब्रा या भागांत पहाटेची अजान आज भोंग्याविना देण्यात आली. तणाव निर्माण होण्याच्या पार्श्वभूमीवर या भागांत अजानसाठी मशिदींनी लाऊडस्पीकर लावले नाही. तर औरंगाबाद, नागपूर, कोल्हापुरमध्येदेखील बहुतांश मशिंदींनीदेखील आवाजाची मर्यादा पाळली आहे.

औरंगाबादेत अनेक मशिदींनी आवाजाच्या मर्यादेचे पालन करत नमाज पठण केली. काही मशिदींनी तर भोंग्याविना नमाज पठण केली. त्यामुळे औरंगाबादेत मशिदींसमोर भोंग्यावरून हनुमान चालिसा लावण्याची आता गरजच राहिली नाही, असे मनसे नेते सुमीत खांबेकर यांनी म्हटले आहे.

पुणे

पुण्यात खालकर मंदिरात आज मनसे कार्यकर्त्यांनी हनुमान चालिसाचे पठन केले. या मंदिराच्या बाजुलाच मशिद असल्याने तणाव निर्माण होण्याची शक्यता होती. त्यामुळे हनुमान चालिसाचे पठन होताच काही मनसैनिकांना पोलिसांनी ताब्यात घेतले. तर चार दिवसाच्या देवदर्शनासाठी वसंत मोरे बालाजीला रवाना झाले आहेत. यापूर्वी राज ठाकरे यांनी भोंग्या विरोधात घेतलेल्या भूमिकेवर वसंत मोरे यांनी नाराजी व्यक्त केली होती.

पिंपरी-चिंचवड

पिंपरी-चिंचवडचे महाराष्ट्र नव निर्माण सेनेचे शहराध्यक्ष सचिन चिखले यांच्यासह पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन अटक केली आहे. सचिन चिखले यांना त्यांच्या घरातून अटक करण्यात आली आहे. उपशहराध्यक्ष विशाल शिवाजी मानकरी, विद्यार्थी सेनेचे भोसरी विधानसभा अध्यक्ष प्रतीक शिंदे, रोहिदास शिवणेकर यांना निगडी पोलिसांकडून अटक केली आहे. दिघी पोलीस स्टेशनकडून अंकुश तापकीर, दिघी शहर अध्यक्ष हेमंत डांगे, चिंचवड विधानसभा अध्यक्ष मयूर चिंचवडे, उपाध्यक्ष बाळा दानवले, उपविभाग अध्यक्ष परमेश्वर चिल्लरगे यांना चिंचवड पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

मुंबई

मुंबईत मनसे नेते संदीप देशपांडे राज ठाकरेंच्या निवासस्थानामधून बाहेर येताच पोलिसांनी त्यांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिस देशपांडे यांच्याकडे पोहोचेपर्यंत ते आपल्या गाडीत बसले होते. त्यानंतर पोलिसांनी वेगाने धाव घेत त्यांना गाडीतून ताब्यात घेण्याच्या प्रयत्न केला. मात्र, या झटापटीत गाडीचा धक्का लागल्याने एक महिला पोलिस कर्मचारी खाली पडून जखमी झाल्या. तेव्हाच संदीप देशपांडे यांनी आपल्या गाडीतून पळ काढला. दरम्यान, या घटनेमुळे राज ठाकरे यांच्या घरासमोरच तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती.

नवी मुंबई

मनसे नवी मुंबई उपशहर अध्यक्ष प्रसाद घोरपडे यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

उल्हासनगर

उल्हासनगरात मनसे कार्यकर्त्यांची धरपकड सुरू झाली आहे. मनसे जिल्हाध्यक्ष सचिन कदम, उपजिल्हाध्यक्ष प्रदीप गोडसे, शहर अध्यक्ष बंडू देशमुख यांना विठ्ठलवाडी पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

ठाणे

राज ठाकरेंच्या या आवाहनानंतर ठाण्यातील चारकोप परिसरात पहाटे 5 वाजता मनसे कार्यकर्त्यांनी नमाजच्या वेळी लाऊडस्पीकरवर हनुमान चालिसा वाजवली. ठाण्यात जमावबंदी लागू करण्यात आली आहे.

नाशिक

नाशिकमध्ये नमाजच्या वेळी हनुमान चालिसा वाजवल्याप्रकरणी 7 महिलांसह ३३  कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे.

धुळे

धुळ्यातदेखील मशिदींसमोर भोंग्यावरून हनुमान चालिसा लावण्याबाबत मनसैनिक आक्रमक झाले होते. त्यामुळे पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत 10 ते 12 कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.

बुलढाणा

राज ठाकरे यांच्या आदेशानुसार बुलढाण्यात आज पहाटेपासून मनसैनिक भोंगे घेऊन सज्ज होते. मशिदींनी भोंग्यांवरून अजान पठण केल्यास मनसैनिकांकडूनही भोंग्यावरून हनुमान चालिसा लावण्यात येणार होती. मात्र, आज बुलडाण्यात बहुतांश मशिदींनी भोंग्यांविना अजान पठण केल्याने या मशिदींसमोरच तैनात असलेले मनसैनिक आपले भोंगे तसेच घेऊन परतले.

दरम्यान नवनीत राणा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या घर असलेल्या मातोश्रीबाहेर हनुमान चालिसाचे पठण करणार असल्याची घोषणा केल्याने संपूर्ण वाद सुरू झाला. या घोषणेनंतर शिवसेनेच्या शेकडो कार्यकर्त्यांनी नवनीत राणांविरोधात निदर्शने केली. त्यानंतर अमरावती लोकसभा मतदारसंघाचे खासदार नवनीत राणा आणि बडनेराचे आमदार पती रवी राणा यांनी 23 एप्रिल रोजी मातोश्रीबाहेर हनुमान चालिसा पठण करण्याची त्यांची योजना रद्द केली असली तरी पोलिसांनी त्यांना अटक करून तुरुंगात पाठवले. १२ दिवसांनंतर आज त्यांची जामिनावर सुटका झाली आहे. मात्र काही अटींवर ही सुटका करण्यात आली आहे. माध्यमांशी बोलण्यास त्यांना मनाई करण्यात आली आहे.