माहेरवाशिणीनी आज घरोघरी पुजल्या गौराई

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

माहेरवाशिणीनी  आज घरोघरी पुजल्या  गौराई

    पिंपरी , (प्रबोधन न्यूज )  -  गणराय पाठोपाठ घरोघरी  गौराई, महालक्ष्मींचे आगमन झाले आहे. ”महालक्ष्मी आली सोन्याच्या पावलांनी” म्हणत हळदी-कुंकूवाच्या थाटात ज्येष्ठा आणि कनिष्ठ गौरीचा गृहप्रवेश करण्यात आला. गौराईंना बसवण्यासाठी घरोघरी सुंदर सजावट करण्यात आली आहे. पहिल्या दिवशी त्यांना नैवेद्य म्हणून भाजी-भाकरी आणि वरण भातचा नैवेद्य देण्यात आला.

आज गौरी पूजन झाले.. काल गौराईचे आगमन, शृंगार सजावट पार पडली. आज पुरणपोळीचा नैवेद्य दाखवण्यात येणार आहे. तर कोकणात गणरायांच्या गणासाठी मटण वड्यांचा नैवेद्य असणार आहे. आज कोकणवासीयांच्या श्रावण सुटणार आहे.

सप्तमीला अनुराधा नक्षत्रात महालक्ष्मीचे आगमन होते. असे मानले जाते, की महालक्ष्मी आपल्या मुलांसह ज्येष्ठ-कनिष्ठ रूपात तीन दिवस तिच्या माहेरी येते. घटस्थापनेनंतर पहिल्या दिवशी विवाहित महिला एकत्र येतात. दुसऱ्या दिवशी महानैवेद्य लावला जातो. यात 16 प्रकारचे गोड पदार्थ, 16 प्रकारच्या भाज्या आणि विविध भोगांचा समावेश आहे. तिसर्‍या दिवशी त्यांना सुख आणि समृद्धीची शुभेच्छा देऊन निरोप दिला जातो.

गौरी म्हणजे शिवपत्नी पार्वती. शुक्ल पक्षातील अनुराधा नक्षत्रावर तिचे आगमन होते. ही माहेरवाशीन तीन दिवसांसाठी येत असून, तिच्या स्वागतासाठी गृहिणींनी घरात मोठी सजावट केली होती. घराची स्वच्छता झाल्यावर, भांड्यांना चकाकी आल्यावर गौरीच्या आगमनाच्या दिवशी मुखवटे अंगणात तुळशीजवळ आणण्यात आले. तांदळाचे पाणी अंगावरून ओवळत केशरी पावले उमटवत गौरी घरात आल्या. गौरीचे घराघरातील रूप खूपच लोभसवाणे होते. कुणाकडे नाक, डोळे कोरलेल्या गौरी, कुणाकडे मुखवटे तर कुणाकडे खड्याच्या गौरी होत्या. 'सोन्याच्या पावलांनी या आणि येथेच कायमच्या राहा' म्हणत गौरीला आसनावर बसवून पूजा-अर्चा करण्यात आली. गौरीला मेथीची भाजी व भाकरीचा साधा नैवद्य दाखविण्यात आला. आजचा दिवस गौरीपूजनाचा आहे. ज्येष्ठ नक्षत्रावर तिचे पूजन होते. धान्यांनी भरलेल्या डब्यांवर गौरीचे मुखवटे बसवायचे. घरात धनधान्य कायम राहावे ही त्यामागची श्रद्धा असते. नव्या साड्या नेसून, दागदागिन्यांनी गौरीला सजविले जाते. गौरीची खणा-नारळाने ओटी भरली जाते. गौरीला नैवद्यात करंजी, पुरणपोळी, खीर, सोळा भाज्या, कढी आदी बेतदेखील आखला जातो. दुपारी साग्रसंगीत नैवद्य झाला की संध्याकाळी हळदी-कुंकवाचा कार्यक्रम सुरू होतो. फुलांच्या, दिव्याच्या माळा, अखंड तेवत राहणारी समई, सुबक रांगोळ्या अन् रात्रभर उखाणे, झिम्मा-फुगड्यांचा फेर तर काही ठिकाणी भजनाचे कार्यक्रमदेखील आयोजित केले जातात. तिसऱ्या दिवशी मूळ नक्षत्रावर गौरी माघारी निघते. तिला दही-भाताचा नैवद्य दाखवला जातो. आरती केली जाते आणि गौरी सासरी जाण्यासाठी निघते.