14 वर्षाच्या मुलाचा 23 वर्षीय विशेष महिलेवर बलात्कार
A PHP Error was encountered
Severity: Notice
Message: Undefined property: stdClass::$link
Filename: post/_post_share_box.php
Line Number: 27
Backtrace:
File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler
File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post
File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once
पिंपरी, दि. 19 मे - गतीमंद असलेल्या २३ वर्षीय महिलेवर तिच्या शेजारी राहणाऱ्या अल्पवयीन मुलाने बलात्कार केला आहे. ही घटना पिंपरी-चिंचवडमध्ये घडली आहे. महिलेच्या शेजारी राहणाऱ्या एका 14 वर्षाच्या मुलाने तिच्या कुटुंबातील सदस्य कामासाठी बाहेर गेले असताना दोन वेळा बलात्कार केला. पोलिसांनी 14 वर्षीय मुलाला ताब्यात घेतले असून, त्याला बाल न्याय मंडळासमोर हजर केले जाणार आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही महिला तिची आई आणि मावशीसोबत राहते. त्या दोघीही दिवसा कामावर जातात. बुधवारी दुपारी तिची मावशी कामावरून परतली असता तिला तिची भाची अस्वस्थ व घाबरलेली दिसली. मावशीला घरातील पडदा बंद असल्याचे दिसले. तो तिच्या भाचीला बंद करता आला नसता. त्यामुळे मावशी आणि आईने आजूबाजूला चौकशी केली आणि काय झाले हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला. तेव्हा शेजारच्या एका 14 वर्षे वयाच्या मुलाने या विशेष महिलेवर बलात्कार आणि अत्याचार केल्याचा संशय आला. त्यानंतर कुटुंबातील सदस्यांनी पोलिसांशी संपर्क साधला.
ही घटना उघडकीस आल्यानंतर बुधवारी रात्री उशिरा पिंपरी चिंचवड हद्दीतील पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी मुलाकडे चौकशी केली असता त्याने 16 आणि 18 मे रोजी तिचे कुटुंबीय घरी नसताना दोन वेळा या महिलेवर बलात्कार केल्याचे कबूल केले. मुलाला ताब्यात घेण्यात आले आहे आणि पुढील कारवाईसाठी त्याला बाल न्याय मंडळासमोर हजर केले जाईल असे सांगण्यात आले.