जनसंवाद सभेचे वार आणि वेळ बदलला - माधव  पाटील 

जनसंवाद सभेचे वार आणि वेळ बदलला - माधव  पाटील 

 पिंपरी , (प्रबोधन न्यूज )  -   १३ मार्चला सर्व नगरसेवकांचा कार्यकाळ संपला आणि १४ मार्च २०२२ पासून प्रशासक आहे, म्हणजे तब्बल ५२६ दिवस प्रशासन कारभार सांभाळत आहेत. ५२६ दिवस झाले लोकांचे लोकप्रतिनिधी नाहीत त्यामुळे लोकांचे प्रश्न कोण मांडणार ? त्यात आपल्या जनसंवाद सभेचा वेळ सोमवार आणि सकाळी १० असा असतो.माधव पाटील मुख्य प्रवक्ता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पिंपरी चिंचवड माधव पाटील यांनी आयुक्त यांच्याकडे केली आहे. 

आठवड्याचा पहिला दिवस असतो त्यामुळे चाकरमान्यांना कामासाठी वेळेत जावे लागते. त्यात पाणी दर दिवसाआड असल्यामुळे महिला वर्ग सकाळी सकाळी घरगुती कामात व्यस्त असतो. त्यात शाळेची तयारी त्यामुळे सोमवारी सकाळी महिला वर्ग आणि नोकरदार माणूस आपल्या अडचणी सांगण्यासाठी जनसंवाद सभेला उपस्तिथ राहू शकत नाही.  
लोकशाहीत न्यायपालिका, प्रशासन आणि कायदेमंडळ देश चालवते. त्यात प्रशासन २४ तास कार्यरत असते. एकदा तर पहाटे ३.२० वाजता उच्च न्यायालयाचे कामकाज सुरु केले होते.  त्यामुळे आपणास विनंती आहे कि जनसंवाद सभा शनिवार किंवा रविवार रोजी घ्यावी. महिन्यातून एकदा प्रशासनाने तसदी घ्यावी जेणेकरून ३० लाख पिंपरी चिंचवडकरांसाठी काही लोक या सभेत लोकांच्या अडचणी मांडण्यासाठी सहभागी होतील.