निसर्ग कवी ना.धों. महानोर  शब्दांचे विद्यापीठ-    रमापुत्र विठ्ठल गायकवाड 

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

      पुणे , (प्रबोधन न्यूज ) - ज्ञानाई फाऊंडेशन आयोजित मा.आमदार ज्येष्ठ निसर्ग कवी पद्मश्री ना.धो.महानोर  यांना अर्थपूर्ण शब्दांजली अर्पण करण्यासाठी कवितेच्या रानात या मैफलीचे आयोजन करण्यात आले होते. काव्यमैफिलीचे अध्यक्ष रमापुत्र विठ्ठल गायकवाड
प्रमुख पाहुणे ज्येष्ठ कवी पत्रकार संजय सोनवणे, दैनिक संध्या प्रा हनुमंत धालगडे सर, आदर्श शिक्षक कवयित्री पत्रकार रूपाली अवचरे दै सकाळ, सूत्रसंचालक,रानकवी जगदीप वनशिव ,संस्थेचे संस्थापक अध्यक्ष लोककवी सीताराम नरके राष्ट्रपती पोलीस पदक मानकरी हे उपस्थित होते
       या सर्व मान्यवरांनी वृक्षाला जल अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात केली. हार फुले मेणबत्ती प्रज्वलित करून निसर्ग कवी पद्मश्री आमदार गीतकार ना .धो. महानोर दादांच्या प्रतिमेस अभिवादन करण्यात आले. 
गायक कवी देवेंद्र गावंडे यांनी 
जांभुळ पिकल्या झाडाखाली 
ढोल कुणाचा वाजं जी
आम्ही ठाकर ठाकर
या रानाची पाखरं
ही दोन्ही महानोर दादांची गीत गायली वातावरण मंत्रमुग्ध केले रसिकांंचा टाळ्यांचा प्रतिसाद मिळाला
कार्यक्रमाचे प्रास्ताविक कवी मच्छिंद्र आप्पासो नरके यांनी केले. 
संस्थेचे अध्यक्ष लोककवी सीताराम नरके यांनी
गहिवरली माती ही रचना सादर करून आपली शब्दांजली वाहिली
गिरीश जाधव यांनी सैराट रान गं 
बाई रान माझं पोटोंशी गं बाई
ही कविता सादर केली
ज्येष्ठ कवी बबन धुमाळ यांनी 
रानात वावरी पडता
पाऊस पावरी होतो 
ही रचना सादर करून रसिकांची मने जिंकली
ज्येष्ठ गझलकार मसूद पटेल सरांनी
जिंदगी माझी जरी बेकार होती
पण व्यथेला केवढा आधार होती
ही गझल रचना सादर करून मनामनात गहिवर आला. 
प्रा अशोक शिंदे यांनी भल्लरी सादर केली. 
प्रमुख पाहुणे ज्येष्ठ कविवर्य संजय सोनवणे यांनी असल्ल ग्रामीण ढंगाची लावणी कमॉन दाजी कमॉन ही रचना सादर सभागृहात हास्य कल्लोळ निर्माण केला .रसिकांनी भरभरून दाद दिली. 
 नानाभाऊ माळी ,चंद्रकांत जोगदंड ,आनंद गायकवाड ,दत्तात्रय खंडाळे ,शांतीलाल ननावरे , संजय भोरे  ,पांडुरंग म्हस्के ,छगन वाकचौरे ,जनाबापू पुणेकर पल्लवी राऊत दत्तात्रय केंजळे  उदय काळे रामचंद्र गुरव या कवीनी हजेरी लावली. 
कवयित्री उमा लुकडे यांनी अप्रतिम रचना सादर करून वाहवा मिळवली 
रानकवी जगदीप वनशिव यांनी आपली बहारदार दमदार रचना सादर करताना ते म्हणाले 
कवी जगताचा धनी
शब्द निसर्गाचा ध्वनी
आपल्या कवितेतून असे व्यक्त झाले
माझ्या कवितेची वही
घेवून जाईन सरणावरती
माझी एकतरी कविता
लिहिल मी माझ्या मरणावरती
     कवी जगण्याचं तत्वज्ञान सांगतो  अन् बदल होत तो कवितेची ताकत कधीही कुठे नाही वाकत तरी  आशा आकांक्षा
विरह  प्रेम निसर्ग शेतीमाती जाती 
शृंगारिक प्रेमभाव व्यक्त करत अनेक रचना मनाला भूरळ पाडत शब्दांजली वाहताना दिसल्या कवीची होणारी काहली वैचारिक मार्मिकपणे मंथन करणारी होती
समाजातील बदल हे फक्त कवी करू शकतात असे निदर्शनास आले
शब्दांजली मैफिलीचे अध्यक्ष रमापुत्र विठ्ठल गायकवाड दादांनी 
माता पिता भाऊ बहिणी नात्यांचा रेशमी गुंता परखडपणे उलगडून सांगितला पहाडी आवाजातील आपल्या गोड गळ्यातून निसर्ग कवी ना.धो महानोर यांना गीतातून शब्दांजली वाहिली ते पुढे असे ते म्हणाले 
निसर्ग कवी ना.धो महानोर दादा म्हणजे शब्दांचे विद्यापीठ आहे
नव कवींनी दादांचा आदर्श जपत रचना लिहिल्या पाहिजेत 
कविता झाडा फुलांत आहे
जरा नीट निरखून बघा
जग हे सुंदर आहे
ते जरा नीट फिरून बघा
  अध्यक्षीय भाषणात आपले मन मनसोक्तपणे व्यक्त केले
सर्व मान्यवर कवींचा सन्मानपत्र देवून त्यांचा  गौरव करण्यात आला
विचारपीठावरील  मान्यवरांचा सत्कार डॉ चारूदत्त नरके सौ.विजयाताई नरके सौ.गायत्री नरके सौ.माधुरी नरके यांनी केले. 
कार्यक्रमाचे आभार श्री हरित नरके यांनी केले. 
ज्ञानाई फाऊंडेशनाच्या सभागृहात निसर्ग कवी ना.धों. महानोर यांना श्रद्धांजली पर  शब्दांजली मैफिलीचा आगळा वेगळा कार्यक्रम संपन्न झाला