जिजाऊचे तेरावे वंशज व मॅनेजमेन्ट गुरु श्री नामदेवराव जाधव बारामती लोकसभेचा उमेदवारी अर्ज भरणार 

जिजाऊचे  तेरावे वंशज व मॅनेजमेन्ट गुरु श्री नामदेवराव जाधव  बारामती लोकसभेचा उमेदवारी अर्ज भरणार 
पिंपरी, (प्रबोधन न्यूज) - जिजाऊचे 13 वे वंशज , जेष्ठ लेखक प्राध्यापक , वक्ते , मंनेजमेन्ट गुरु श्री नामदेवराव जाधव यांना बारामती लोकसभेचा उमेदवारी अर्ज भरणार असल्याचे नुकत्याच झालेल्या बैठकीत निर्णय घेतला.  यावेळी स्वराज्य पक्षाचे अध्यक्ष अडव्होकेट श्रीहरी बागल यांची प्रा.  नामदेवराव जाधव यांचे सोबत लोकसभा निवडणुक संदर्भात सविस्तर चर्चा सम्पन्न झाली.
     नामदेव जाधवांनी  बारामती लोकसभा मतदारसंघातून लोकसभेची निवडणूक लढवणार असल्याचं जाहीर केलं आहे. हे जाहीर करताना छत्रपत्री शिवाजी महाराजांनी  स्वप्नात येऊन आपल्याला निवडणूक लढवण्याचा दृष्टांत दिल्याचा दावा जाधव यांनी केला आहे. त्याचबरोबर मागील जन्मात आपण लखुजी जाधवराव होतो, असेही नामदेव जाधव म्हणालेत.
 एवढंच नाही तर ज्याप्रमाणे शिवाजी महाराजांना गुप्तधन सापडलं त्या पद्धतीनं आपल्याला देखील जमिनीखाली गुप्तधन सापडेल असे तारे नामदेव जाधव यांनी तोडलेत. या सगळ्या दाव्यांमुळं तुमच्यावर अंधश्रद्धा पसरवल्याबद्दल कारवाई होऊ शकते का? असं विचारल्यावर आपण कोणत्याही कारवाईला घाबरत नसल्याचं नामदेव जाधव म्हणाले आहेत. 
नामदेव जाधव म्हणाले की,  बारामतील मतदार संघ हा  शहाजी राज्यांच्या जाहगिरीचा प्रदेश आहे. सिवाजी महाराजाच्या स्वराज्याच्या निर्मितीचं केंद्रबिंदू आहे. इथेच शिवाजी महाराजांनी शपथ घेतली आहे. पहिला किल्ला ताब्यात दिलेला तोरणा किल्लादेखील इथेच आहे. संभाजी महाराजांचा जन्मस्थळ असलेला पुरंदर किल्लादेखील याच मतदारसंघामध्ये आहे. यातील कोणत्याही किल्ल्यांचा विकास झालेला नाही. या किल्ल्यांचा विकास व्हावा, अशी इच्छा आहे. त्यात मी निवडणूक लढावी अशी इच्छादेखील अनेकांनी बोलून दाखवली आहे.  असं असतानाच मला पहाटे शिवाजी महाराजांची पुण्यतीथी असलेल्या दिवशी म्हणजेच 3 एप्रिलला दृष्टांत झाला. छत्रपत्री शिवाजी महाराजांनी स्वप्नात येऊन निवडणूक लढवण्याचा दृष्टांत दिला, असा दावा  केला आहे.
 
ते पुढे म्हणाले, शिवाजी महाराजांचं वास्तव्य असलेल्या बारातमीजवळ  असलेल्या चार किल्ल्यांवर जाणारे हायवे, रोपवे, हेलिपॅड असावे. असं केल्यास चार लाख तरुणांना रोजगार मिळेल. चार लाख तरुणांसोबत चार लाख कुटुंबांना पैसे मिळतील आणि बारामती लोकसभेतून कोणीही बेरोजगार राहणार नाही, हे सगळं शिवाजी महाराजांनी साडे चारशे वर्षापूर्वी तयार करुन दिलं आहे. मात्र हे वाडे पडत आहे आणि आम्ही झोपडी बांधण्याची तयारी करत आहोत, हे आमचं दुर्दैव आहे. त्यामुळे निवडणूक लढवण्याचा दृष्टांत दिला असल्याचं ते म्हणाले.