"शिक्षण आणि संस्कार यांचा संगम असलेले श्री आनंद पार्श्व गुरूकुल विद्यार्थ्यांसाठी वरदान" भूमिपूजन समारंभात प पू कुंदनॠषिजी
A PHP Error was encountered
Severity: Notice
Message: Undefined property: stdClass::$link
Filename: post/_post_share_box.php
Line Number: 27
Backtrace:
File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler
File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post
File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once
अहमदनगर (प्रबोधन न्यूज ) -शिक्षण आणि संस्कार यांचा संगम असलेले श्री आनंद पार्श्व गुरुकुल या परिसरातील विद्यार्थ्यांसाठी नजीकच्या भविष्य काऴात वरदान ठरेल!"महाराष्ट्र प्रवर्तक प पू कुंदनॠषिजी म सा यांनी मत व्यक्त केले.
केडगाव अकोळनेर रोड या ठिकाणी आनंद नवकार परिवार ट्रस्ट संचलित श्री आनंद पार्श्व गुरूकुलच्या दुसऱ्या फेज मधील इमारतींचा भूमिपूजन समारंभ परमपूज्य महाराष्ट्र प्रवर्तक पू कुंदन ऋषीजी म सा आणि संस्कार दिवाकर प पू आलोक ऋषीजी म सा यांच्या मंगलमय सानिध्यात आणि प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत अतिशय उत्साहात संपन्न झाला.त्यावेळी ते बोलत होते.
समारंभास मुख्य अतिथी म्हणून माणिकचंद उद्योग समूहाचे प्रमुख श्रीमान प्रकाश धारिवाल, लुंकड समूहाचे प्रमुख उद्योगपती दानशुर श्री रमणलाल लूंकड ,अहमदनगर येथील प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते आणि शिक्षण संस्था प्रमुख रमेश फिरोदिया ,श्रीमती जयकवर बाई लोढा परिवार, जैन काॅन्फरन्सचे नि अध्यक्ष पारस मोदी , आनंद नवकार परिवार ट्रस्टचे अध्यक्ष श्रीमान अशोक पारख , आर्किटेक्ट किरण कांकरिया यांच्या हस्ते आणि कार्याध्यक्ष डॉ अशोककुमार पगारिया, महामंत्री राजकुमार लुनिया ,कोषाध्यक्ष सीए मोहन बरमेचा, मनोज शेटिया, सुनील बाफना, मनोज बाफना ,संदेश लोढा राजेंद्र छल्लाणी ,रुचिरा सुराणा , तसेच स्कुल कमिटी सदस्य मेघा बोरा,आकांक्षा चोरड़िया, ईश्वर धोका ,धनेश कोठारी, प्रीतेश दुगड़, सीए जयेश बांठिया ,भावेश चोरड़िया ,राहुल सुराणा,अमित लोढ़ा, धनेश लोढ़ा, सुदर्शन डुंगरवाल ,अभिनन्दन भन्साळी, अक्षय बाफना, आनंद शिंगी,नितीश बरमेचा आदी युवा कार्यकर्ते, आणि विशेष अतिथी यांच्या उपस्थितीत अतिशय उत्साहात संपन्न झाला .
कार्यक्रमाचा शुभारंभ पू कुंदनॠषिजी यांच्या मंगलाचरणाने झाली . तदनंतर संस्थेचे कार्याध्यक्ष प्रा. अशोककुमार पगारिया यांनी आपल्या प्रास्ताविकात आनंद नवकार परिवार ट्रस्ट चा स्थापनेपासून चार इतिहास आणि कार्याची वाटचाल , विश्वस्त यांची माहिती दिली आणि गुरू कुलच्या प्रकल्पाची माहिती, उद्दिष्टे थोडक्यात विशद केली ! तदनंतर रु ११ लाख आणि त्यापेक्षा जास्त देणगी जाहीर करणार्या दानशुर महानुभावांचा गूरू आनंद प्रतिमा देऊन यथोचित सन्मान करण्यात आला , प्रमुख अतिथी रमणलाल लूंकड, आणि प्रकाश धारीवाल यांनी आपल्या भाषणात "या गुरूकुल प्रकल्पाची प्रशंसा करुन संस्थेला या प्रकल्पासाठी जास्तीत जास्त देणगी देऊन सहयोग देण्याचे आश्वासन दिले" , पारस जी मोदी यांनी ही संस्थेची शैक्षणिक प्रकल्पाची माहिती देऊन सढळ हाताने मदत करण्याचे उपस्थितांना आवाहन केले' प पू आलोकॠषिजी यांनी त्यांचे अनेक वर्षाचे स्वप्न पू आनंदॠषिजी म सा च्या कृपेने आणि पू कुंदनॠषिजी म सा यांच्या प्रेरणेने, विश्वस्त मंडळाच्या परिश्रमाने , दानशुर महानुभावांच्या सहकार्याने साकार होत असल्याचा आनंद व्यक्त केला . यावेळी टेंडर पुस्तिकेचे विमोचन करण्यात आले.
कार्यक्रमाचे संचालन कोषाध्यक्ष मोहन बरमेचा , विश्वस्त मनोज शेटिया, आणि कार्याध्यक्ष प्रा. अशोककुमार पगारिया यांनी केले ,कार्यकर्मा साठी सीए रवि कटारिया, नंदकुमार भटेवरा, राजेंद्र मुनोत, चंपालालजी गांधी, तपस्वी रत्ना मीराबाई लुणिया, श्रीमती निर्मला छाजेड , शांतीलाल बोरा ,किरण बोरा , राजेंद्र बोरा ,रविंद्र लुंकड, राजेंद्र लुंकड आदि मान्यवर आणि शाळेच्या मुख्याध्यापिका आणि शिक्षिका ,युवा कार्यकर्ते आदी उपस्थित होते. स्व आनंद भटेवरा यांच्या स्मरणार्थ सुनिलकुमार भटेवरा आणि सुनिल कांकरिया यांनी गौतम प्रसादी ची व्यवस्था केली . आभार प्रदर्शन मनोज शेटिया यांनी केले तर सूत्रसंचालन दीपाली सुराणा यांनी केले.