माजी महापौर संजोग वाघेरे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत बॉडीपल्स थेरेपी कॅम्प व वृक्षारोपण व विवीध कार्यक्रम संपन्न

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

माजी महापौर संजोग वाघेरे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत बॉडीपल्स थेरेपी कॅम्प व वृक्षारोपण व विवीध कार्यक्रम संपन्न



पिंपरी (प्रबोधन न्यूज ) - पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे माजी महापौर तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते संजोग वाघेरे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत बॉडीपल्स थेरेपी कॅम्प तसेच वृक्षारोपन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. हा कॅम्प गुरूवार दि.२४ ते दि.२५ ऑगस्ट २०२३ रोजी सकाळी १० ते ६ यावेळेत संजोग वाघेरे पाटील यांच्या संपर्क कार्यालयासमोर पिंपरीगाव घेण्यात आला.
बॉडीपल्स थेरेपी कॅम्पमध्ये मधुमेह, पार्किन्सन, व्हेरिकोज व्हेन्स, सांधेदुखी, थायरॉईड, पाठदुखी, कंबरदुखी, निद्रानाश, अर्धांगवायू , टाचदुखी, सायटीका, गुडघेदुखी, मायग्रेन, स्पॉंडिलेसिस, मासिक पाळीत होणारा त्रास, हार्मोन्स प्रॉब्लेम्स, अन्नपचन संबंधित समस्या, मज्जातंतू व स्नायू संबंधित समस्या, वजन वाढणे व कमी होणे या आजारावरती थेरेपी करण्यात आली.
या मोफत बॉडीपल्स कॅम्पचे आयोजन  नगरसेविका उषाताई वाघेरे पाटील, युवानेते ऋषिकेश वाघेरे पाटील यांच्यावतीने करण्यात आले होते. त्यामध्ये पिंपरीगाव व परिसरातील जास्तीजास्त नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसादाने या थेरेपी कॅम्पचा लाभ घेतला.
तसेच येरवडा मेंटल हॉस्पिटल येथे प्रवीण नाणेकरांच्यावतीने खाऊ वाटप तसेच यशवंतराव चव्हाण संस्था येथे ब्लॅंकेट व रोख देणगी देण्यात आली.
वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पिंपरी चिंचवड येथील सर्व पक्षाचे कार्यकर्ते सहभागी झाले त्यामध्ये भोसरी विधानसभा प्रथम आमदार मा.श्री.विलास लांडे, मा.श्री.अण्णा बनसोडे, शहराध्यक्ष मा.श्री.अजितभाऊ गव्हाणे, महिला अध्यक्षा सौ.कविताताई आल्हाट, कार्याध्यक्ष प्रशांत शितोळे, फजल शेख, नगरसेवक  विठ्ठल उर्फ नाना काटे राहुल भोसले, संगीता तामाने, पंकज भालेकर, प्रसाद शेट्टी, संगीताताई कोकणे,निकिताताई कदम, मा. उपमहापौर प्रभाकर वाघेरे, भाजपा नगरसेवक शत्रुघ्न काटे, कविताताई खराडे, संजय अवसरमल, मीरा कदम, वर्षा शेंडगे, पुष्पाताई शेळके, पौर्णिमा पालेकर, शकुंतला भाट, ज्योती गोफणे, सुवर्णा निकम ,उषाताई काळे,दिलीप काळे, भाऊसाहेब भोईर, सारिका पवार, दत्तात्रय वाघेरे, शिवाजी पाटोळे, पल्लवी पांढरे, मनीषा गटकळ, विशाल वाकडकर, शेखर काटे, विशाल काळभोर, प्रसाद कोलते,प्रतीक साळुंखे, स्वाती उर्फ माई काटे, सतीश दरेकर, पंकज भालेकर, आशा तापकीर, राजेंद्र साळुंखे, श्याम लांडे, कार्याध्यक्ष मोरेश्वर भोंडवे ,मयूर कलाटे, विक्रांत लांडे, अमोल भोईर, संजय लंके, संतोष अण्णा वाघेरे, बाळासाहेब वाघेरे तसेच पक्षाचे सर्व पदाधिकारी व समस्थ पिंपरी ग्रामस्त उपस्थित राहिले .