नाना काटे यांच्या प्रचाराचा महिलाशक्तीच्या रॅलीद्वारे समारोप !
नाना काटे यांच्या सुविद्य पत्नी शीतल काटे यांनी शुक्रवारी पिंपळे सौदागर, रहाटणी परिसरातील विविध भागातून काढलेल्या रॅलीला महिलावर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
A PHP Error was encountered
Severity: Notice
Message: Undefined property: stdClass::$link
Filename: post/_post_share_box.php
Line Number: 27
Backtrace:
File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler
File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post
File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once
नाना काटेंनाच निवडून आणण्याचा महिलांचा निर्धार
चिंचवड, दि. 24 (प्रतिनिधी) - 'नाना काटे, आगे बढो, हम तुम्हारे साथ है', 'येऊन येऊन येणार कोण? नानांशिवाय आहेच कोण', शीतलताई आगे बढो, हम तुम्हारे साथ है' अशा विविध घोषणा देत शुक्रवारी काढण्यात आलेल्या रॅलीने चिंचवड मतदारसंघ दणाणून गेला होता. माजी नगरसेविका तथा महाविकास आघाडीचे उमेदवार नाना काटे यांच्या सुविद्य पत्नी शीतल काटे यांनी शुक्रवारी पिंपळे सौदागर, रहाटणी परिसरातील विविध भागातून काढलेल्या रॅलीला महिलावर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. मतदारसंघाच्या विकासासाठी नाना काटेंनाच निवडून आणण्याचा निर्धार या रॅलीत सहभागी झालेल्या महिलाशक्तीने केला.
या रॅलीत शीतल काटे यांच्यासमवेत आ. निलेश लंके, माजी नगरसेवक शंकर काटे, राष्ट्रवादी काँग्रेस नगर जिल्हाध्यक्ष घनश्याम शेलार यांची प्रमुख उपस्थिती होती.
प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एक स्त्री असते, हे खरंच असावं. कारण नाना काटे यांच्या पाठीमागे नव्हे तर त्यांच्या खांद्याला खांदा देऊन त्यांच्या पत्नी नगरसेविका शीतल काटे काम करत आहेत. एक स्त्री जसे आपल्या कुटुंबातील सर्व सदस्यांची काळजी घेते, तसेच शीतल काटे आपल्या प्रभागातील प्रत्येक स्तरातील नागरिकांच्या अडी अडचणी सोडवतात. मग आता त्यांना आम्ही पाठिंबा देणारच, अशी भावना यावेळी महिलावर्गाने व्यक्त केली.
शीतल काटे यांनी महिलांच्या आर्थिक सबलीकरणासाठी विविध उपक्रम राबविले. बचतगटाच्या माध्यमातून अनेक महिलांना स्वयंरोजगाराची संधी मिळवून दिली. त्यांच्या अथक प्रयत्नांनी पिंपळे सौदागर परिसरातील महिला आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनल्या. याशिवाय युवतींसाठी स्वसंरक्षणाचे प्रशिक्षण, व्यवसाय कौशल्याचे प्रशिक्षण देण्यासाठीही त्यांनी पुढाकार घेतला. नाना काटे आणि शीतल काटे हे उभयंता त्यांच्या प्रभागासारखेच संपूर्ण चिंचवड मतदारसंघाचाही कायापालट करतील, याची आम्हाला खात्री असल्यामुळेच आम्ही नाना काटे यांनाच प्रचंड मते देऊन निवडून आणणार असल्याचे या रॅलीतील महिलांनी सांगितले.