पोलीस अधिकाऱ्यांना बढती मिळाली, पण काहींचा हा आनंद औट घटकेचा ठरला

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

पोलीस अधिकाऱ्यांना बढती मिळाली, पण काहींचा हा आनंद औट घटकेचा ठरला

नांदेड, दि. 1 जून - पदोन्नतीचा आनंद हा काही पोलीस अधिकाऱ्यासांठी औटघटकेचा ठरला आहे. राज्यातील काही पोलीस निरीक्षक पदावरील अधिकाऱ्यांना पदोन्नती देऊन पोलीस उपअधीक्षक बनवले गेले. मात्र, त्यांना मिळालेली ही पदोन्नती औटघटकेची म्हणजे फक्त एका दिवसाची ठरली. कारण सायंकाळी हे पोलीस उपअधीक्षक पदावरुन नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले.

मिलिद गायकवाड, कृष्णदेव पाटील, बंडू कोंडूभैरी, आनंदा होगडे, अनिल बोरसे, सुरेश सोनावणे, श्रीमंत शिंदे, इंद्रजीत राऊत, संजय साळुंखे हे अधिकारी पदोन्नतीचे आदेश प्राप्त झाल्यानंतर काही तासांतच सेवानिवृत्त झाले.

राज्यातील 415 पोलीस निरीक्षक पोलीस उपअधीक्षक पदासाठी पात्र असल्याची ग्रेडेशन लिस्ट 24 जानेवारी 2022 रोजी जारी करण्यात आली. मात्र, तरीसुद्धा त्यांची पदोन्नती झाली नाही. पदोन्नती झालेल्या अधिकाऱ्यांना गेल्या काही महिन्यांपासून बढतीची अपेक्षा आहे. सध्या राज्यात पोलीस उपअधीक्षक पदाच्या 192 जागा खाली आहेत. मात्र, तरीसुद्धा वेळेत पदोन्नतीचे आदेश काढले जात नाहीत, अशी ओरड आहे. याच परिस्थितीत शासनाकडून 27 मे रोजी 18 पोलीस निरीक्षकांची यादी मागवून त्यांना पदोन्नती देण्यात आली. यानंतर मंगळवारी 31 मे रोजी या पदोन्नतीचे आदेशही देण्यात आले. मात्र, त्यांचा हा पदोन्नतीचा आनंद औटघटकेचा ठरला. सकाळी बढती मिळाली आणि त्यातले काही अधिकारी नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले.