महानगरपालिकेच्या वतीने मिशन इंद्रधनुष्य मोहीम
A PHP Error was encountered
Severity: Notice
Message: Undefined property: stdClass::$link
Filename: post/_post_share_box.php
Line Number: 27
Backtrace:
File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler
File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post
File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once
पिंपरी , (प्रबोधन न्यूज ) - महानगरपालिकेच्या वतीने मिशन इंद्रधनुष्य मोहीम राबविण्यात येत असून या मोहिमेत शून्य ते पाच वर्षे वयोगटातील बालकांचे लसीकरण करण्यासाठी संपुर्ण देशभर लसीकरण करण्यात येत असून शहरातील बालकांनी लस घेतली नसल्यास त्यांच्याकरिता महानगरपालिकेच्या दवाखान्यात तसेच रुग्णालयांमध्ये आणि सर्व जोखमीच्या भागांमध्ये बाह्य संपर्क सत्रांद्वारे लसीकरणाची विशेष सोय उपलब्ध असून पालकांनी आपल्या बालकांचे लसीकरण करून घ्यावे असे आवाहन आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे यांनी केले.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने या मोहीमेचा प्रारंभ आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे यांच्या उपस्थितीत आज आकुर्डी रुग्णालय येथे करण्यात आला, त्यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी महिला आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. वर्षा डांगे, अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अभयचंद्र दादेवार, ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. बाळासाहेब होडकर, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, डॉ. विकास बोरकर, डॉ. राहुल साळुंके, डॉ. धीरज तायडे, डॉ. वैभव म्हस्के, डॉ. अंजली ढोणे, पीएचएन लता जगताप, शाहीन खान,एमपीडब्ल्यू संदीप जगताप, दत्तात्रय इंगळे यांच्यासह सामाजिक कार्यकर्ते फादर खिंडो, इमॅन्युएल व्ही. सी, मसुद शेख, सुलतान मुलानी, मुसा शेख, रवाजा पटेल उपस्थित होते.
विशेष मिशन इंद्रधनुष्य ५.० मोहीम शहरात तीन फेऱ्यांमध्ये होणार असून यामध्ये पहिली फेरी आजपासून १२ ऑगस्टपर्यंत, दुसरी फेरी ११ ते १६ सप्टेंबर तर तिसरी फेरी ९ ते १४ ऑक्टोबर रोजी संपन्न होणार आहे. लसीकरण पुर्ण करण्यासाठी शहरात विविध ठिकाणी ३६२ विशेष लसीकरण सत्रांचे आयोजन केले जाणार असून प्रत्येक बालकाचे डिजीटल एमपीसी कार्ड तयार केले जाणार आहे.
केंद्र शासनाने ऑगस्ट २०२३ पासून ३ फेऱ्यांमध्ये सर्व जिल्हे व महानगरपालिकांमध्ये ‘’विशेष मिशन इंद्रधनुष्य ५.०" कार्यक्रम हाती घेतला आहे. या मोहिमेत लसीकरणापासून पूर्णपणे वंचित राहिलेले किंवा अर्धवट लसीकरण झालेल्या सर्व बालकांचा शोध घेऊन त्यांचे लसीकरण करण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार महापालिकेने पिंपरी चिंचवड शहरात लसीकरण मोहीम राबविण्याचे नियोजन केले झोपडपट्टी आणि इतर जोखमीच्या भागातही लसीकरण करण्यात येणार असल्याची माहिती आरोग्य वैद्यकीय अधिकारी डाॅ.लक्ष्मण गोफणे यांनी दिली.