देशाच्या जडणघडणीत धनगर समाजाचे योगदान ! - पिंपरी-चिंचवड भाजपा शहराध्यक्ष शंकर जगताप यांचे मत

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

देशाच्या जडणघडणीत धनगर समाजाचे योगदान !  - पिंपरी-चिंचवड भाजपा शहराध्यक्ष शंकर जगताप यांचे मत


- ऑल इंडिया धनगर महासंघातर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान

    पिंपरी , (प्रबोधन न्यूज )   -   देशातील शेवटच्या घटकांतील म्हणजेच एनटी, एसटी आणि ओबीसी समाजातील लोकांच्या हितासाठी भाजपा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी काम करीत आहेत. पिंपरी-चिंचवडमध्ये महाराष्ट्रातीलच नव्हे; तर देशाच्या कानाकोपऱ्यातून कामगार, कष्टकरी वास्तव्यास आलेले आहेत. धनगर समाज हा अत्यंत कष्टाळू राना- वनात राहणारा म्हणून ओळखला जातो. मात्र, या समाजाने गुणवत्तेच्या आधारे देशाच्या जडणघडणीमध्ये मोठे योगदान दिले आहे, असे मत भाजपा शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी व्यक्त केले.

दिल्ली येथील ऑल इंडिया धनगर समाज महासंघाच्या पिंपरी-चिंचवड शाखेच्या वतीने धनगर समाजातील इयत्ता दहावी व बारावी परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी महासंघाचे प्रदेशाध्यक्ष प्रविण काकडे, विधानपरिषद आमदार रामहरी रुपनवर, माजी नगरसेवक राजु दुर्गे, आशा शेडगे,  वैद्यकीय अधिकारी लक्ष्मण गोफणे, अंकुशराव भांड, अरुण पाडुळे, हनुमंत दुधाळ, निवांत कोळेकर, युवराज नरुटे, गजानन वाघमोडे, वैशाली भोजणे, मुकंद कुचेकर, डॉ. दिनेश गाडेकर, अजय दुधभाते, महावीर काळे, विवेक बिडकर, संतोष पांढरे, नवनाथ देवकाते, संजय कवितके, दिपक राहिन्स, सोमनाथ ओव्हाळ, यशोदा नाईकवडे, दादा दोलतडे, बिरु व्हनमाने ,सुनिल बनसोडे,धनंजय तानले आदी  उपस्थित होते.

यावेळी ऑल इंडिया धनगर समाज महासंघाच्या वतीने भाजपा शहराध्यक्ष शंकर जगताप यांचा  "काठी आणि घोंगडे" देऊन सन्मान केला.

शंकर जगताप म्हणाले की,  पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी आपल्या कार्यकाळात देशातील अनेक मंदिरांचा जीर्णोद्धार केला. हाच आदर्श डोळ्यासमोर ठेऊन प्रधानमंत्री नरेंद्र जी मोदी यांनी काशीविश्वेश्वर, वाराणसी, उज्जैन अश्या तीर्थक्षेत्रांचा विकास करण्याचा संकल्प केला आणि तो पूर्णत्वास नेण्यासाठी प्रचंड मेहनत करीत आहेत. पिंपरी-चिंचवड शहराच्या जडणघडणीमध्ये धनगर समाजातील युवकांचे कामगारांचं कष्टकऱ्यांचं महत्त्वपूर्ण योगदान राहिलं आहे. या समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांनी स्पर्धेच्या युगामध्ये स्वतःला सिद्ध करत विविध महत्त्वाच्या पदांवरती स्थान मिळवलेला आहे. ऑल इंडिया धनगर समाज महासंघाच्या माध्यमातून असा हा गुणवंतांचा गौरव सोहळा निश्चितच आदर्शवत आहे.



"गुणवत्ता विद्यार्थी युवा पिढी हे भारत देशाचे उज्वल भवितव्य आहेत. त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याने प्रत्येक पालकांनी आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी अत्यंत चिकाटी आणि आत्मविश्वासाने आपल्या आवडत्या क्षेत्रात प्रगती केली पाहिजे, अशी माझी भावना आहे. पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाच्या माध्यमातून इयत्ता दहावी आणि बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना सुरू केलेली आहे. या योजनेचा या गुणवंत विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी लाभ घेतला पाहिजे,  तसेच पुढील शिक्षणाच्या दृष्टीने स्पर्धा परीक्षा आणि विविध कौशल्य आधारित कार्यक्रमांमध्ये सहभागी झाले पाहिजे."
                    - शंकर जगताप, शहराध्यक्ष, भाजपा, पिंपरी-चिंचवड.