महिलांचे आर्थिक सक्षमीकरण ही काळाची गरज - प्रा. कविता आल्हाट
समाजातील महिलांना नुसत्या सक्षम नव्हे तर बचत गटांच्या माध्यमातून आर्थिक दृष्ट्या सक्षमीकरण करण्याच्या दृष्टीने मार्गदर्शन करणे्््
A PHP Error was encountered
Severity: Notice
Message: Undefined property: stdClass::$link
Filename: post/_post_share_box.php
Line Number: 27
Backtrace:
File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler
File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post
File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once
मोशीत संपन्न झाला भव्य बचत गट मेळावा
पिंपरी - लक्षवेध स्पोर्ट्स फाउंडेशन मोशी व पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक यांच्या संयुक्त विद्यमाने मोशी येथील जय गणेश लॉन्स भारत माता चौक येथे जागतिक महिला दिन निमित्ताने महिलांसाठी भव्य बचत गट मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
याप्रसंगी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक चिंचवड शाखा व्यवस्थापक सौ सोनाली हिंगे यांनी बँकेच्या महिला बचत गटांसाठीच्या कर्ज योजना बाबत सविस्तर मार्गदर्शन केले.
महाराष्ट्र राज्य कृषी विभागाअंतर्गत येणाऱ्या प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया योजनांबाबत मोशीचे कृषी पर्यवेक्षक श्री अमोल ढवळे सर तसेच कृषी सहाय्यक सौ रुपाली भोसले यांनी मार्गदर्शन केले.
महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र यांच्यामार्फत महिलांसाठींच्या नवीन उद्योग व्यवसायासाठी असणाऱ्या योजनांचे मार्गदर्शन वरिष्ठ प्रकल्प अधिकारी श्री शशिकांत कुंभार यांनी केले, तसेच पिंपरी चिंचवड मनपाच्या महिला बालकल्याण व इतर कल्याणकारी योजनांबाबत चे मार्गदर्शन मनपाच्या समूह संघटिका सौ कीर्ती वानखेडे व सौ जयश्री पवळे यांनी केले.
सदर कार्यक्रमासाठी पिंपरी चिंचवड शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष श्री अजित गव्हाणे, माजी नगरसेवक अरुण बोराडे, माजी नगरसेवक वसंत बोराटे ,शहर उपाध्यक्ष आतिष बारणे ,माजी विधानसभा अध्यक्ष उत्तम आल्हाट, युवा नेते विशाल जाधव, प्रकाश आल्हाट, प्रदीपआबा तापकीर, राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टीच्या स्वयम रोजगार विभागाच्या प्रदेशाध्यक्ष मेघा पवार,सामाजिक कार्यकर्त्या रूपाली आहेर, संगीता जाधव, प्रतीक्षा आहेर, पूजा बोराडे, सुजाता आल्हाट, मनीषा पवार ,आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक लक्षवेध स्पोर्ट्स फाउंडेशनच्या अध्यक्ष तसेच राष्ट्रवादी महिला शहराध्यक्ष सौ कविता अल्हाट यांनी केले. सूत्रसंचालन पुनम वाघ यांनी तर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन संगीता आहेर यांनी केले. पिंपरी चिंचवड महिला बचत गटात बचत गट महासंघाच्या अध्यक्ष कविता खराडे यांनी बचत गटांना घरगुती उपक्रमाबाबत मार्गदर्शन केले.
समाजातील महिलांना नुसत्या सक्षम नव्हे तर बचत गटांच्या माध्यमातून आर्थिक दृष्ट्या सक्षमीकरण करण्याच्या दृष्टीने मार्गदर्शन करणे हा या मेळाव्याचा मूळ उद्देश होता असे कविता आल्हाट यांनी सांगितले .त्या दृष्टीने महिलांना उद्योग व्यवसायाचे प्रशिक्षण म्हणून मेघा पळशीकर यांच्याकडून हर्बल साबण बनविण्याचेही प्रात्यक्षिक देण्यात आले. या महिला मेळाव्यास यशस्वी करण्यासाठी मोशी चिखली परिसरातील अनेक बचत गटातील महिला भगिनींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.