पुणे पोलिसांनी गुन्हेगारांवर उगारले ‘ब्रम्हास्त्र’, पुण्यातील गुन्हेगारी मोडण्याचा निश्चय

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

पुणे पोलिसांनी गुन्हेगारांवर उगारले ‘ब्रम्हास्त्र’, पुण्यातील गुन्हेगारी मोडण्याचा निश्चय

पुणे, (प्रबोधन न्यूज )   - पुणे शहरातील गुन्हेगारी वाढली आहे. कोयता गँगचा धुमाकूळ सुरु आहे. पुणे अन् पिंपरी चिंचवडमध्ये गाड्यांची तोडफोड होत आहे. पिंपरी चिंचवडमध्ये व्यापाऱ्यांवर कोयताने हल्ला झाला आहे. गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलीस ॲक्सन मोडमध्ये आले आहे. गेल्या दोन तीन दिवसांत पोलिसांनी तब्बल दीड हजार गुन्हेगारांवर कारवाई केली आहे. पुणे शहरात कोम्बिंग ऑपरेशन राबवण्यात आले. त्यानंतर शनिवारी पोलिस आयुक्त रितेश कुमार रस्त्यावर उतरले. त्यावेळी तब्बल १६५ गुन्हेगारांना अटक केली गेली. आता पोलिसांनी गुन्हेगारी रोखण्यासाठी ‘ब्रम्हास्त्र’ बाहेर काढले आहे. या ‘ब्रम्हास्त्र’ चा वापर करुन २० जणांवर कारवाई केली गेली आहे.

का केली कारवाई

दीपक जाधव याने गँग तयार केली होती. अनेक गुन्हेगारी घटनांमध्ये त्याचा हात होता. शहरात दहशत निर्माण करण्याचे काम तो करत होता. दत्तवाडी पोलीस ठाणे, सावंतवाडी पोलीस ठाणे, भारती विद्यापीठ पोलीस ठाणे अंतर्गत आरोपींनी दहशत निर्माण केली होती. त्यात काही जणांनी गाड्याही फोडल्या होत्या. आरोपींवर यापुढेही धडक कारवाई सुरु राहणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.