कन्हैयालाल खून प्रकरणात भाजप कनेक्शन ? फोटो व्हायरल

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

कन्हैयालाल खून प्रकरणात भाजप कनेक्शन ? फोटो व्हायरल

उदयपूर-राजस्थान (प्रबोधन न्यूज) - राजस्थानच्या उदयपूरमधील कन्हैयालाल हत्याकांडावरून आता आरोप-प्रत्यारोपाचे राजकारणही तीव्र झाले आहे. उदयपूर जघन्य हत्या प्रकरणातील आरोपींचे भाजपच्या दोन नेत्यांशी संबंध उघड झाले आहेत, त्यामुळे पक्षाच्या सर्वोच्च नेतृत्वाने यावर स्पष्टीकरण द्यावे, असे काँग्रेसने म्हटले आहे. काँग्रेसचे प्रवक्ते पवन खेरा यांनी शनिवारी येथील पक्षाच्या मुख्यालयात पत्रकार परिषदेत सांगितले की, काल एका मीडिया ग्रुपने उदयपूरमधील भीषण घटनेच्या संदर्भात अतिशय खळबळजनक खुलासा केला असून, कन्हैयालालच्या हत्यारांचा भाजपच्या नेत्यांशी संबंध असल्याचा फोटोच प्रसिद्ध केला आहे. या हत्याकांडामागे भाजपचा एक विशिष्ट हेतू असल्याचे म्हटले आहे.

ते म्हणाले की रियाझ अटारी हे राजस्थान भाजपचे दिग्गज नेते आणि राज्याचे माजी गृहमंत्री गुलाबचंद कटारिया यांच्या कार्यक्रमांमध्ये अनेकदा सहभागी होत असल्याचेही या खुलाशातून समोर आले आहे. रियाझ राजस्थान भाजप अल्पसंख्याक युनिटच्या बैठकीला उपस्थित असल्याचे चित्रही समोर आले आहे. संपूर्ण देशात धार्मिक उन्माद पसरवण्याचा प्रयत्न करून भाजप आपल्या प्रवक्त्या आणि नेत्यांच्या माध्यमातून संपूर्ण देशात आग लावून राजकीय ध्रुवीकरणाचा फायदा घेण्याचा प्रयत्न करत आहे का, असा सवाल प्रवक्त्याने केला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा हे उन्माद पसरवण्याच्या त्या पक्षाच्या नेत्यांच्या प्रयत्नांवर गप्प बसतील का, असा प्रश्नही त्यांना पडला आहे. ते म्हणाले की, भाजप नेते इर्शाद चैनवाला यांच्या 30 नोव्हेंबर 2018 आणि मोहम्मद ताहिर यांच्या 03 फेब्रुवारी, 27 ऑक्टोबर आणि 28 नोव्हेंबर 2019 आणि 10 ऑगस्ट 2021 च्या फेसबुकवरील पोस्ट आणि कन्हैयालालच्या हत्येचा आरोप असलेला रियाझ हा केवळ भाजप नेत्यांच्या जवळचाच नव्हता, तर ते भाजपचे सक्रिय सदस्यही होते.