नागालँडमध्ये रामदास आठवलेंनी दोन आमदार निवडून आणले

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

नागालँडमध्ये रामदास आठवलेंनी दोन आमदार निवडून आणले

नवी दिल्ली – नागालँडमध्ये विधानसभेच्या निवडणुका झाल्या आहेत. त्याची मतमोजणी आज सुरू आहे. नागालँडलमध्ये केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या रिपब्लिकन पक्ष पार्टीचे  उमेदवार २ जागांवर निवडून आले आहेत. तर, एनडीपीपीचा उमेदवार १ जागेवर निवडून आला आहे. भाजपाचे उमेदवार २ जागेवर निवडून आले असून, १२ जागांवर आघाडीवर आहेत. नागालँड विधानसभा निवडणूक 2023 साठी 27 फेब्रुवारी रोजी 60 जागांवर मतदान झाले होते.

नागालँडमधील तुएनसांग जिल्ह्यातील नोक्सेन विधानसभा जागा अनुसूचित जमातीसाठी राखीव होती. या मतदारसंघात एनडीपीपीचे एच. चुबा चँग आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (आठवले) वाय. लिमा ओनेन चँग यांच्यात चुरशीची लढत होती. या जागेवर वाय. लिमा ओनेन चँग यांनी विजय मिळवला आहे.

तुएनसांग सदर-2 मतदारसंघातून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (आठवले) इमतीचोबा चांग यांनी विजय मिळवला आहे. या जागेवर एनडीपीपी, एनपीएफ, काँग्रेस आणि आरपीआय यांच्यात रंजक लढत पाहायला मिळाली. येथे राष्ट्रवादी लोकशाही पुरोगामी पक्षाचे के. के. ओडिबेंडांग चांग, नागा पीपल्स फ्रंट एच. झुंगकुम चँग, इंडियन नॅशनल काँग्रेस झेड थ्रोंगसो आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) इम्तिचोबा रिंगणात होते.

ईशान्य भारतातील तीन राज्यात विधानसभा निवडणुका पार पडल्या आहेत. मेघालय, नागालँडमधील विधानसभा निवडणुकीसाठी सोमवारी (२७ फेब्रुवारी) मतदान पार पडलं. तर, त्रिपुरा राज्यात १६ फेब्रुवारी रोजी मतदान संपन्न झालं होतं. आज तिन्ही राज्यांची मतमोजणी प्रक्रिया पार पडणार असून, निकाल हाती येणार आहे. त्रिपुरात भाजपा, नागालँडमध्ये एनडीएचा सहकारी नॅशनल डेमोक्रॅटिक प्रोगेसिव्ह पार्टी (एनडीपीपी) आणि मेघालयात नॅशनल पीपल्स पार्टी (एनपीपी) आपली सत्ता राखण्यात यशस्वी होणार का? याकडे सर्व देशाचं लक्ष लागलं आहे.

नागालँडमध्ये भाजपा मित्रपक्ष असलेली एनडीपीपी पक्षाने बहुमताचा आकडा पार केला आहे. एनडीपीपी ३७ जागांवर आघाडीवर आहे. एनडीपीपी व भाजप आघाडी सत्तेच्या दिशेने घोडदौड करीत आहे.