भिंतीला भगदाड पाडून बँक लुटण्याचा प्रयत्न

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

भिंतीला भगदाड पाडून बँक लुटण्याचा प्रयत्न

   पिंपरी , (प्रबोधन न्यूज )  -   बँकेच्या शेजारी असलेल्या दुकानाचे शटर उचकटून त्या दुकानातून भिंतीला भगदाड पाडून बँक लुटण्याचा डाव पोलिसांनी उधळला. ही घटना रविवारी (दि. 9) पहाटेच्या सुमारास डांगे चौक येथे उघडकीस आली आहे.

डांगे चौक येथे फेड बँक आहे. या बँकेच्या शेजारी ॲड. जवळ यांचे कार्यालय आहे. या कार्यालयाचे शटर रात्रीच्या वेळी दोघांनी उचकटले. दुकानात प्रवेश करून त्यांच्या शेजारी असलेल्या फेड बँकेत प्रवेश करण्यासाठी भिंत फोडण्याचा दोघांनी प्रयत्न केला.

दरम्यान, हा प्रकार एका कामगाराच्या निदर्शनास आला. कामगाराने आपल्या मालकाला याबाबत माहिती दिली. मालकाने तात्काळ डायल 112 वर पोलिसांना माहिती दिली. त्यानुसार वाकड पोलीस ठाण्यातील गस्तीवरील पथक डांगे चौकात दाखल झाले. पोलीस आल्याचे लक्षात येताच चोरटे पत्र्यावरून पळून जाऊ लागले. मात्र गस्तीवरील पथकातील एका पोलिसांनी त्यांचा पाठलाग करून एकास पकडले.

यामध्ये पोलीस कर्मचाऱ्याच्या पायाला गंभीर दुखापत झाली. घटनेची माहिती मिळताच मोठा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला.