'पाकिस्तान झिंदाबाद' च्या घोषणा प्रकरणी कोंढव्यात पुणे पोलिसांची छापेमारी; सहा जणांना घेतले ताब्यात

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

'पाकिस्तान झिंदाबाद' च्या घोषणा प्रकरणी कोंढव्यात पुणे पोलिसांची छापेमारी; सहा जणांना घेतले ताब्यात

पुणे, (प्रबोधन न्यूज) – पुण्यासह राज्यभरात एनआयए आणि एटीएस कडून छापेमारी करत पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या अनेक कार्यकर्त्यांची धरपकड केली आहे. याच्या निषेधार्थ पुण्यात पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या वतीने पुण्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलन करण्यात आलं होतं. यावेळी आंदोलकांच्या वतीने केंद्र सरकारच्या यंत्रणांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. या घोषणाबाजी दरम्यान पाकिस्तान जिंदाबादचे नारे लावण्यात आले होते. या प्रकरणी पाकिस्तान झिंदाबाद नाऱ्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पुणे पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. आता या प्रकरणी आयबीच्या वतीने 6 जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतलं आहे.

या प्रकरणी कलम 153, 124, 109, 120 ब हे कलम नव्याने समाविष्ट करण्यात आले आणि आज सकाळीच कोंढवा येथून 6 जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतलं आहे. थोड्याच वेळात पुणे पोलिसांच्या वतीने या 6 जणांना कोर्टात हजर करण्यात येणार आहे, अशी प्राथमिक माहिती मिळत आहे.

या प्रकरणी अब्दुल बनसाल माजी अध्यक्ष एसडीपीआय, ऐनुल मोमीन माजी जिल्हा अध्यक्ष पिएफआय, काशीफ शेख, स्टेट पिएफआय मेंबर, दिलावर सय्यद, उपाध्यक्ष एसडीपीआय, माझ शेख पीएफआय फिझिक शिक्षक आणि मोहम्मद कैस पी एफ आय अध्यक्ष यांना पुणे पोलिसांनी चौकशी साठी ताब्यात घेतलं आहे. ताब्यात घेतलेल्या कार्यकर्त्यांची कोंढवा पोलिस स्थानकात आयबीचे आधिकारी कसून चौकशी करत आहेत. दरम्यान, जिल्हाधीकारी कार्यालयासमोरील आंदोलनाप्रकरणी देखील पोलिस चौकशी करत असल्याचे माहिती सूत्रांनी दिली

देश विघातक कृत्य केल्याप्रकरणी नाशिक येथील ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’ या संघटनेच्या काही सदस्यांवर गुन्हा दाखल केला होता. यानंतर २२ सप्टेंबर रोजी पहाटेच्या सुमारास पुण्यातील कोंढवा परिसरात दहशतवाद विरोधी पथकाने ‘पीएफआय’ संघटनेच्या कार्यालयावर छापा टाकण्यात आला. या कारवाईमध्ये पीएफआय संघटनेचे माजी राज्य सरचिटणीस रझी खान आणि अब्दुल कय्युम शेख या दोघांना अधिकार्‍यांनी ताब्यात घेतले होतं. त्यावेळी दोघांकडून काही साहित्यही जप्त केले होते.

दरम्यान, दहशतवाद्यांशी संबंधित आरोपांबाबत राष्ट्रीय तपास यंत्रणा (NIA) आणि महाराष्ट्र एटीएसच्या पथकाने मध्यरात्री 8 राज्यांतील 25 ठिकाणी पुन्हा छापेमारी केली आहे. तपास यंत्रणांनी छापेमारीची दुसरी फेरी सुरु केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 8 राज्यांमध्ये पीएफआयच्या ठिकाणांवर छापे टाकण्यात येत आहेत. तसेच अनेक पीएफआय सदस्यांना ताब्यात घेण्यात आलं आहे. दरम्यान महाराष्ट्रातील औरंगाबाद आणि सोलापूरमधूनही पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या  कार्यकर्त्यांना एटीएस आणि एनआयएने ताब्यात घेतले आहे. तर ठाण्यातून 4 आणि कल्याण, भिवंडीतून प्रत्येकी एक- एक कार्यकर्त्याला ताब्यात घेण्यात आले आहे.

काही दिवसांपूर्वीच पीएफआयच्या देशभरातील कार्यलयांवर छापेमारी करण्यात आली. यावेळी जवळपास 100 जणांना अटक करण्यात आली होती. यानंतर करण्यात आलेल्या चौकशीत अनेक महत्त्वाचे धागेदोरे तपास यंत्रणांच्या हाती लागले आहेत. त्यानुसार महाराष्ट्रातही काल एनआयए आणि एटीएसकडून संयुक्त कारवाई केली. सोमवारी मध्यरात्रीपासून तपास यंत्रणा ठिकठिकाणी छापेमारी करत आहेत.

यात औरंगाबादमध्येही एटीएस आणि पोलिसांनी कारवाई करत पीएफआयच्या आणखी 13 ते 14 कार्यकर्ते ताब्यात घेतले. तर सोलापूर, ठाणे, कल्याण, भिवंडीतही कारवाई करण्यात आली आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणेने स्थानिक तपास यंत्रणांसह पुन्हा छापेमारी सुरु केली आहे. यात आसाममधून 7, कर्नाटकमधून 10 जणांना अटक केली आहे. यात पीएफआय आणि एसडीपीआयच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे. देशभरातील आठ राज्यांमध्ये ही छापेमारी सुरू आहे. तर मंगळुरु पोलिसांनीही PFI आणि SDPI चे सदस्यांना ताब्यात घेतलं आहे. याशिवाय कोलार जिल्ह्यातील पोलिसांनी पीएफआयच्या 6 सदस्यांना अटक करण्याच आल्याचीही माहिती मिळत आहे. आसाम, दिल्ली, युपी, महाराष्ट्र अशा अनेक राज्यांत ही छापेमारी सातत्याने सुरु आहे.

पीएफआय संघटना देशविरोधी कारवायात असल्याचा आरोप तपास यंत्रणांनी ठेवला आहे. या संघटनेच्या माध्यमातून 2047 पर्यंत भारताला मुस्लिम राष्ट्र बनवण्याचे त्यांचे उद्दिष्ट असल्याचा दावा तपास अधिकाऱ्यांनी केला आहे. पीएफआयकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, भाजपच्या पदाधिकाऱ्यांच्या हत्येचा कट आखला असल्याचेही अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.